31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमहाराष्ट्रRavikant Tupkar: ...अन्यथा अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ; रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

Ravikant Tupkar: …अन्यथा अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ; रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाहीये. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी तुपकर यांच्या नेतृत्त्वात मोठा मोर्चा मुंबईकडे निघाला असून, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

कापसाच्या प्रश्नासंबंधी तुपकर यांनी जिल्हाभर सभा घेतल्या. बुलढाण्यात भव्य मोर्चाही काढला. हजारो शेतकरी, महिला, तरुणांनी या मोर्चात मोठया संख्येने सहभाग घेतला. त्यांनी देखील सरकारविरोधात संताप व्यक्त केला. पण एवढे करूनही राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऊस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. तर 24 तारखेला होणाऱ्या जलसमाधी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

बुलढाण्यातील हजारो शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अरबी समुद्रात हे शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव द्यावा, नुकसान भरपाई मिळावी, अशा मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत. 68 टक्के शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम सरकार करत आहे. असा इशारा तुपकर यांनी दिला.
सरकारने या प्रश्नावर काय चर्चे केली, असा प्रश्न विचारला असता रविकांत तुपकर म्हणाले, आम्हाला चर्चेलाही बोलावलं जात नाहीये. शेतकऱ्यांना मदत मिळाली तर त्याचं श्रेय आम्हाला जाईल. असं सरकारला वाटत असेल तर त्याचं श्रेय तुम्ही घ्या. पण सोयाबीनला 8,500 आणि कापसाला कमीत कमी 12,500 रुपये भाव द्या अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली.

हे सुध्दा वाचा

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे-तेजस्वी यादव यांची भेट देशातील राजकारणाला कलाटणी देईल : आमदार मनिषा कायंदे

Maharashtra Politics : दोन महिन्यांत काय होईल सांगता येत नाही; दानवे यांचे बुचकुळ्यात पाडणारे विधान

Devendra Fadanvis : शेती पंपांच्या वीज जोडण्या कापू नका!; फडणवीसांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा

रब्बीचा हंगाम सुरु आहे. रात्रीची नको तर दिवसाची वीज हवी आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे आम्हाला तेही दिले जात नाहीये. रात्री आम्ही शेताला पाणी कसे देणार, पिकविमा कंपन्यांनी आम्हाला फसवलं आहे.सरकारने अजून काही नुकसान भरपाई केलेली नाहीये.
काहीही झालं तर मागे हटणार नाही. पोलिसांनी कितीबही दबाव आला तरी आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही. पोलिसांनी आम्हाला आंदोलन न करण्याची नोटीस दिली आहे. आमचं आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तरीही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!