29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रVikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते विक्रम यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोखले यांच्यावर रुग्णालयाचे डॉक्टर उपचार करत असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांनी डोळे उघडून हातापायांची देखील हालचाल केल्याचे देखील रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते विक्रम यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोखले यांच्यावर रुग्णालयाचे डॉक्टर उपचार करत असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांनी डोळे उघडून हातापायांची देखील हालचाल केल्याचे देखील रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना भरती करण्यात आलं होतं. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं सांगत गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही बोललं जात होतं. आता २५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाने विक्रम गोखले यांच्या प्रकृतीची माहिती दिली.

विक्रम गोखले यांची तब्बेत अचानक खालावल्यामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयात भरती केले हेते. त्यानंतर रात्री उशीरा त्यांचे निधन झाल्याची अफवा सर्वत्र पसरली. समाजमाध्यमांमध्ये त्यांच्या श्रद्धांजलीचे मेसेज देखील मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले. अखेर त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याचे सांगावे लागले. तसेच गोखले यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी देखील माध्यमांना गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. रुग्णालयाच्या जनसंपर्क विभागाने देखील गोखले यांच्या प्रकृतीबाबत अधिकृतपणे माध्यमांना माहिती दिली आणि गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याचे सांगितले.

आज रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष यादगीकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, गोखले हे उपचारांना प्रतिसाद देत असून आज त्यांनी डोळे उघडले. तसेच त्यांच्या हातापायांची देखील हलचाल झाली. त्यांना सध्य व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून ते पुढचे 48 तास व्हेंटिलेटरवर असतील त्या नंतर त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात येणार असल्याची माहिती यादगीकर यांनी माध्यमांना दिली.

विक्रम गोखले यांच्या निधनाच्या वृत्ताच्या अफवेमुळे त्यांचे अनेक चाहते दुखावले गेले होते. त्यांच्या मुलीने देखील त्यांनंतर त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन चाहत्यांना केले होते. दरम्यान विक्रम गोखले यांची प्रकृती आज काही प्रमाणात सुधरली असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी