27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeव्हिडीओVIDEO : १९ गावचे पाणी प्यायलेला अधिकारी !

VIDEO : १९ गावचे पाणी प्यायलेला अधिकारी !

तुकाराम मुंढे यांच्या गेल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत एकुण 19 ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे ते एका ठिकाणी सरासरी एक वर्षापेक्षाही कमी वेळ कार्यरत असतात. मात्र, या गोष्टीवरून त्यांची समाजातील छबी वाईट होण्याच्या ऐवजी एक निर्भिड़ अभिकारी म्हणून प्रचलित झाली आहे. 

VIDEO : १९ गावचे पाणी प्यायलेला अधिकारी !

तुकाराम मुंढे हे आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असणारे IAS अधिकारी आहेत. त्यांची कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे ते कधीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करत नाहीत. शिवाय त्यांच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा शिस्तीत राहून काम करावे लागते. त्यामुळेच ते ज्या ठिकाणी अधिकारी म्हणून नियुक्त होतात त्या ठिकाणाहून लगेचच त्यांच्याबद्दल तक्रारी यायला सुरुवात होते आणि त्यांची बदली केली जाते. गेल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या एकुण 19 ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे ते एका ठिकाणी सरासरी एक वर्षापेक्षाही कमी वेळ कार्यरत असतात. मात्र, या गोष्टीवरून त्यांची समाजातील छबी वाईट होण्याच्या ऐवजी एक निर्भिड़ अभिकारी म्हणून प्रचलित झाली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी