28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रएका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

केंद्र सरकरच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेची स्थापना केली असून या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे.

केंद्र सरकरच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेची स्थापना केली असून या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे पदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाचा या महत्वाच्या पदावर एका लुटारूची नियुक्ती करण्यास तीव्र विरोध आहे. वेळ पडल्यास हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर आवाजही उठवू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नगर विकास विभागाचे निर्णय घेणारा अजय आशर नावाचा व्यक्ती कोण? असा सवाल विचारला होता. देवेंद्र फडणवीस त्यावेळी विरोधी पक्षनेते होते व त्यांचाही असाच आक्षेप होता. आता त्याच लुटारु व्यक्तीची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकार निती आयोगासारख्या महत्वपूर्ण संस्थेत कॅबिनेट दर्जाच्या उपाध्यक्षपदी कशी करू शकतात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजय आशर यांच्या नियुक्तीला सहमती आहे का? तसेच कर्नाटकला महाराष्ट्रातील काही गावे देण्याचा घाट घातला जात आहे, उद्योग गुजरातला जात आहेत तसेच राज्याची तिजोरी लुटायचा निर्णय घेतला आहे का ? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे.
हे सुद्धा वाचा :
‘कृषि’तुल्य शरद पवार! (निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा विशेष लेख)
अभिजित कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार
होय, आम्ही ‘उजवेच’ आहोत… (आमदार ॲड्. आशीष शेलार यांचा विशेष लेख)

अजय आशर या व्यक्तीबद्दल भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात आक्षेप घेतला होता. मग आता भाजपाचे मनपरिवर्तन झाले आहे का? काल ज्या व्यक्तीवर आक्षेप घेतला त्याच व्यक्तीच्या हाती राज्याची तिजोरी देणे कितपत योग्य आहे? या नियुक्तीमागे भाजपाचाही काही स्वार्थ आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे, असे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी