29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीयबाबा रामदेव भेसळसम्राट; पतंजली ब्रँडचे तूप नकली - भाजपा खासदाराचा आरोप

बाबा रामदेव भेसळसम्राट; पतंजली ब्रँडचे तूप नकली – भाजपा खासदाराचा आरोप

योगगुरू बाबा रामदेव हे भेसळसम्राट असून त्यांच्या पतंजली ब्रँडचे तूप नकली असल्याचा आरोप एका भाजपा खासदारानेच केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना, “अयोध्येत पाय तर ठेवून दाखवा,” असे खुले आव्हान देणाऱ्या उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनीच हे गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे ज्यांच्यापुढे “शरण” गेले होते, ते बृजभूषण आता रामदेवबाबांना भिडले असल्याने भाजपाची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर पतंजली या ब्रँड नावाने बनावट तूप विकल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रामदेव हे ‘कपाल भाटी’ चुकीच्या पद्धतीने शिकवत असल्याचेही सिंह म्हणतात. रामदेव यांच्या शिकवणीचे पालन करणाऱ्यांच्या आरोग्यवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोपही सिंह यांनी केला आहे.

ब्रिजभूषण म्हणाले, की अशक्त जोडप्याचे मूल दुर्बल जन्माला येते, तर निरोगी व्यक्तींचे मूल निरोगीच जन्माला येते. निरोगी राहण्यासाठी घरांमध्ये स्वच्छता आणि शुद्ध दूध आणि तूप असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी घरीच गाय किंवा म्हैस पाळावी. बाजारातील बनावट तूप आजिबात घेऊ नये.

लवकरच तज्ञ आणि संतांची बैठक बोलावून त्यांना महर्षी पतंजलीच्या नावाचे शोषण थांबवण्याचे आवाहन करणार असल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी “लय भारी”ला सांगितले. रामदेव समर्थकांद्वारे तयार केलेल्या आणि विकल्या जात असलेल्या बनावट दुग्धजन्य पदार्थांविरुद्धच्या आंदोलनाला संतांनी आशीर्वाद द्यावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Baba Ramdev : महिलांनी काही घातले नाही तरी त्या चांगल्या दिसतात

राज ठाकरेंबद्दलच्या खा. ब्रिजभूषण यांच्या भूमिकेवर भापज नेत्यांनी खुलासा करावा : अतुल लोंढे

सुरेश जैन यांच्या पंटरांचे जळगावात नसते उद्योग; शहर भकास करणारा म्हणे करेल विकास!

बनावट तुपाबाबत वक्तव्यावर रामदेव यांनी ब्रिजभूषण सिंह यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, सिंह यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, “मी कधीही माफी मागणार नाही आणि मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी