29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रसाताऱ्यातील मंत्र्याचा गावभर बोभाटा; वाढदिवसाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांना फतवा

साताऱ्यातील मंत्र्याचा गावभर बोभाटा; वाढदिवसाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांना फतवा

तीन आठवड्यांपूर्वी साताऱ्यातील एका कॅबिनेट मंत्र्याचा धुमधडाक्यात वाढदिवस झाला. पण आता महिना उलटत आला तरी वाढदिवसाच्या वर्गणीची वसूली मात्र सुरूच आहे. जिल्ह्यातील सर्वच खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना देखील वर्गणीचा आदेश असल्याचे सुत्रांनी सांगितले असून अधिकारीवर्ग या मंत्र्यांच्या दंडेशाहीपुढे हतबल झाले आहेत.

तीन आठवड्यांपूर्वी साताऱ्यातील एका कॅबिनेट मंत्र्याचा धुमधडाक्यात वाढदिवस झाला. पण आता महिना उलटत आला तरी वाढदिवसाच्या वर्गणीची वसुली मात्र सुरूच आहे. जिल्ह्यातील सर्वच खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना देखील वर्गणीचा आदेश असल्याचे सुत्रांनी सांगितले असून अधिकारीवर्ग या मंत्र्यांच्या दंडेशाहीपुढे हतबल झाले आहेत. या मंत्री महोदयांची भाषा देखील अतिशय मग्रुरीची असल्याचे अधिकारी सांगतात.

हे मंत्री महोदय मागील सरकारमध्ये देखील राज्यमंत्री होते. आता ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांचा थाट देखील वाढला आहे. अधिकाऱ्यांशी बोलताना हे मंत्रीमहोदय अतिशय सरंजामी थाटात वागत असतात. पैसे न दिल्यास ते अधिकाऱ्यांची पत न पाहता त्यांचा पानउतारा करत आहेत. त्यामुळे रोजच या अधिकाऱ्यांना चारचौघात अपमानित व्हावे लागत आहे. बर हे मंत्रीमहोदय मुख्यंत्र्यांचे देखील एकमद खासे आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना देखील त्यांच्याविरोधात वरिष्ठाकडे आपली कैफीयत मांडता येत नसल्याने रोजचाच तोंड ताबून बुक्क्यांचा मार अशा परिस्थितीतून त्यांना जावे लागत आहे.

हे सुद्धा वाचा
आता शिवरायांच्या पंक्तीत मोदींना बसवू पाहत राज्यपाल ‘पॅकअप’च्या मूडमध्ये; घटनात्मक पदाचा प्रोटोकॉल धाब्यावर, राष्ट्रपतींऐवजी अमितभाईंकडे मागितले मार्गदर्शन!

VIDEO : 2007 अन् 2011 साली आपण जिंकलो कारण संघात युवराज सिंग होता

तोंड काळे झालेले वाचाळ चंद्रकांत पाटील यांची बेताल बडबड; म्हणे, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्रात कार्यकर्ते भीक मागतात!

या मंत्र्यांकडे सध्या ज्या खात्याचा कारभार आहे त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील ते हुजऱ्याप्रमाने वागवत आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची देखील हे मंत्री महोदय मुलाहिजा राखत नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये ‘ह्याच साठी का हेला होता अट्टाहास’ असे म्हणायची वेळ आली आहे. जनतेची रडगाणी सोडविण्यासाठी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहून रात्रंदिवस अभ्यासकरुन अधिकारी अधिकारी झालो. पण आता असे मिराशीखोर मंत्री उठताबसता अक्कल पाजळवून पाण उतारा करत असतात. तसेच चौकशी लावू का?, तुलाच लय समजतं का?, तुला कुणी भरती केलं? अशा भाषेत अधिकाऱ्यांना हे मंत्री बोलत असतात त्यामुळे हे दुखणे आता सांगावे कुणाला अशी स्थिती अधिकाऱ्यांची झाली आहे.

गेल्या महिन्यात वाढदिवस झाला त्यासाठी लक्षावधी रुपयांची उधळण करण्यात आली. पण या उधळणीच्या दहापट वसूली सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यासाठी अधिकारीवर्गाला वसुलीसाठी जुंपले आहे. अशा वसूलीमुळे अधिकारी वर्ग मेटाकूटीला आला आहे. मात्र या प्रकारावर जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनीधी देखील मुग गिळून गप्प आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी