33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयभारत-चीन सैन्यामध्ये चकमक; भारताचे जोरदार प्रत्युत्तर

भारत-चीन सैन्यामध्ये चकमक; भारताचे जोरदार प्रत्युत्तर

भारत आणि चीनी सैन्यामध्ये आज पून्हा चकमक उडाली, ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनी चैन्यांमध्ये चकमक झाली.

भारत आणि चीनी सैन्यामध्ये आज पून्हा चकमक उडाली, ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनी चैन्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्याहून अधिक संख्येने चीनी सैन्य जखमी झाल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली. सुत्रांच्या माहितीनुसार चीनचे सुमारे 300 सैनिक जोरदार तयारी करून आले होते, मात्र भारतीय सैन्याने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चीनी सैन्याला भारत इतक्या तयारीनिशी समोर येईल याची शक्यता वाटली नव्हती.  दोन्ही बाजूंच्या काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आणि दोन्ही बाजूंनी ताबडतोब या भागातून बाहेर पडल्याचे देखील सुत्रांनी सांगितले आहे.

याआधी देखील सन 2020 मध्ये 15 आणि 16 जून रोजी रात्री भारत आणि चीनचे सैन्यामध्ये गलवान घाटीमधील एलएसीमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी भारतीय कमांडरसह 20 जवान शहीद झाले होते. त्यावेळी चीनचे देखील बरेच नुकसाण झाले होते. अनेक सैन्य देखील मृत्यूमुखी पडले होते. मात्र चीनने या गोष्टीला दुजोरा दिला नव्हता. नंतर मात्र चीन ने चार सैनिक मारले गेल्याची सांगितले होते. तर अनेक प्रसारमाध्यांमधून आलेल्यावृत्तानुसार चीनचे 38 जवान नदीत वाहून गेले होते. जून महिन्यातील चकमकी आधी मे महिन्यात देखील भारत आणि चीनी सैन्यात चकमक झाली होती.
हे सुद्धा वाचा
शिवसेना कुणाची : सुनावणी काही मिनिटेच चालली…

कोचिंग क्लासच्या तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोट न सापडल्याने गुढ वाढले

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

यापूर्वी भारत आणि चीनी सैन्यात पाचवेळा अशी चकमक झाली आहे. 1962 सालचे युद्ध त्यानंतर 1967, 1975, 2020 आणि आता 2022 मध्ये देखील दोन्ही देशांच्या सैन्यात चकमकी झाल्या. 1962 साली पहिल्यांदा चकमक झाल्यानंतर युद्धाचा वणवा पेटला होता. त्यानंतर 1967 साली चकमक झाली, यावेळी भारताने चीनला जोरदार प्रत्यूत्तर दिले होते. त्यानंतर 1975 साली चीनने अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला केला होता. या चकमकीत भारताचे 4 जवान शहीद झाले होते.

तर 9 डिसेंबर रोजी भारत आणि चीन सैन्यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील एलएसीजवळ चकमक उडाली. या चकमकीत दोन्ही देशाचे जवान किरकोळ जखमी झाले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याने चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी