25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे; नाना पटोले यांचे वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे; नाना पटोले यांचे वक्तव्य

काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अकोल्यात बोलताना नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे असल्याचा दावा केला.

राज्यात गेले काही महिने महापुरुषांबद्दल नेत्यांनी केलेल्या अवमानकार वक्तव्यामळे संतापाचे वातावरण असताना आता काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अकोल्यात बोलताना नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे असल्याचा दावा केला. नाना पटोले म्हणाले शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपुर्ण देशला दिशा देवून राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर मी काम करत असल्याचे देखील पटोले म्हणाले.

काही दिवसांपुर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजपचे आमदार प्रसाद लाड, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने केल्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. अशातच आता नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
भारत-चीन सैन्यामध्ये चकमक; भारताचे जोरदार प्रत्युत्तर

शिवसेना कुणाची : सुनावणी काही मिनिटेच चालली…

कोरोनानंतर प्रथमच घडला विक्रम; एका दिवसात तब्बल दीड लाख प्रवाशांचा मुंबई विमानतळावरुन प्रवास

अकोल्यात बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष बोलतो एक आणि करतो दुसरेच. महापुरुषांच्या नावाने मतांची भीक मागणारे भाजपचे नेते महापुरुषांचा अपमान करतात. महाराष्ट्रात राहून देखील महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्याची भाजपच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या नेत्यांवर भाजप कोणतीही कारवाई करत नाही. उलट या नेत्यांना पंतप्रधानांच्या शेजारी उभे केले. हा महाराष्ट्रचा आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!