29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeव्हिडीओVideo : पुण्यातील मूक मोर्च्याला महिलेचा विरोध

Video : पुण्यातील मूक मोर्च्याला महिलेचा विरोध

पुणे बंदच्या दिवशी याठिकाणी असलेले सौदामिनी हॅन्डलूम नावाचे दुकान मात्र वेळेत खुले करण्यात आले. संपूर्ण पुण्यातील दुकानांना टाळे असताना हे दुकान मात्र खुले ठेवण्यात आले होते. अशावेळी मूक मोर्च्यात सहभागी झालेल्या काही तरुणांनी हे दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु सौदामिनी हॅन्डलूमच्या अनघा घैसास यांनी आपले दुकान बंद न करण्याचा निर्णय घेतला.

राज्याचे राज्यपाल असो किंवा राजकीय नेते असो.. हल्ली राजकारण्यांकडून महापुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये या राजकारण्यांकडून करण्यात आली आहेत. याचविरोधात मंगळवारी पुण्यात मूकमोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला पण पुण्यातील सौदामिनी हॅन्डलूम नावाचे एक दुकान मात्र वेळेत खुले करण्यात आले. संपूर्ण पुण्यातील दुकानांना टाळे असताना हे दुकान मात्र खुले ठेवण्यात आले होते. अशावेळी मूक मोर्च्यात सहभागी झालेल्या काही तरुणांनी हे दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु सौदामिनी हॅन्डलूमच्या अनघा घैसास यांनी आपले दुकान बंद न करण्याचा निर्णय घेतला.

अनघा घैसास यांनी त्यांचे दुकान बंद न ठेवण्याच्या निर्णयाला काहींनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी कडाडून टीका देखील केली आहे. अनघा यांचे दुकान बंद करण्यासाठी जे आंदोलक तरुण त्यांच्या दुकानावर आले होते त्यांना अनघा यांनी समजावून पुन्हा पाठवले. परंतु सौदामिनी हॅन्डलूम हे दुकान त्यांनी पुणे बंदच्या दिवशी देखील पूर्णवेळ सुरूच ठेवले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी