28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeजागतिकअभिमानास्पद : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात 'या' भारतीय संगीतकाराने रचला इतिहास !

अभिमानास्पद : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीय संगीतकाराने रचला इतिहास !

2023 हे वर्ष भारताच्या मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष ठरत आहे. पहिले जगभरात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला. आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बंगळुरूमध्ये राहणारे संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नावलौकिक मिळवली आहे. रिकीने तिसर्‍यांदा बहुप्रतिक्षित ग्रॅमी अवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे. ‘डिव्हाईन टाइड्स’ (Divine Tides) या अल्बमसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. (Indian Musician Creates History at Grammy Awards!)

65व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात (65th Annual Grammy Awards) भारतीय म्यूझिक कंपोझर रिकी केजला तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ही सर्व भारतीयांसाठी अभिनाची बाब आहे. संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ‘ग्रॅमी’चं नाव घेतलं जातं. यंदाचा ग्रॅमी पुरस्कार नुकताच पार पडला आहे. या 65व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय म्यूझिक कंपोझर रिकी केजला तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ही सर्व भारतीयांसाठी अभिनाची बाब आहे.

बंगळूरु येथे राहणाऱ्या रिकी केजला तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या ‘डिवाइन टाइड्स’ या अल्बमसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. अमेरिकेत जन्माला आलेल्या लोकप्रिय संगीतकाराने ब्रिटीश रॉक बँड ‘द पुलिस’चे ड्रमर स्टीवर्ट कोपलँडसोबत हा पुरस्कार शेअर केला आहे. कारण या अल्बममध्ये रिकीसोबत स्टीवर्ड यांनी देखील गायन केले आहे. दोघांना हा पुरस्कार सर्वोत्कृष्ठ इमर्सिव ऑडिओ अल्बम या कॅटेगिरीमधून देण्यात आला आहे.

रिकी केजने पहिल्यांदा 2015मध्ये ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सहभाग घेतला होता. त्यांचा विंड्स ऑफ समसारा या अल्बने त्यावेळी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर 2022मध्ये डिवाइन टाइड्स या अल्बमसाठी ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ हा पुरस्कार मिळाला. आता 2023मध्ये डिवाईन टाइड्स या अल्बमसाठी ‘सर्वोत्कृष्ठ इमर्सिव ऑडिओ अल्बम’ हा पुरस्कार मिळाला आहे.

दरम्यान रिकीने आपल्या ट्विटर हँडलवर गेल्या वर्षी टाकलेल्या ग्रॅमी पुरस्काराच्या पोस्टला पिन केले आहे. यामध्ये ग्रॅमी जिंकलेल्या सात वर्षाच्या आव्हानात म्हणजेच 2015 आणि 2022 मध्ये रिकीसोबत मोदीजी फोटोत दिसत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अगदी सारखेच दिसत आहेत. पण माझे वय खूप झाले आहे. तुमचे रहस्य काय आहे सर?? अशी गमतीशीर पोस्ट त्यांनी शेयर केली आहे.

हे सुद्धा वाचा : लोकप्रिय गायक केके यांनी संगीतक्षेत्राला काय दिले याचे विश्लेषण करणारी हेमंत देसाई यांची पोस्ट

राज्य गीताचा दर्जा मिळालेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’… गीताच्या गीतकाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

आशा भोसलेंनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायले गाणे

 

कोण आहे रिकी केज?

रिकी केजचा जन्म 5 ऑगस्ट 1981 रोजी झाला, तो अर्धा पंजाबी आणि अर्धा मारवाडी आहे. यानंतर, जेव्हा ते 8 वर्षांचे होते, तेव्हा ते बंगळुरूला शिफ्ट झाले. तेथूनच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. डेंटल कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी संगीतात प्रवेश घेतला. अभ्यासादरम्यान तो एका रॉक बँडचा भाग बनला आणि येथूनच त्याला संगीताची आवड निर्माण झाली. केजने आपल्या करिअरची सुरुवात कीबोर्ड आर्टिस्ट म्हणून केली होती. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी त्यांचा स्टुडिओ सुरू केला. रिकी हा एक प्रसिद्ध भारतीय म्यूझिक कंपोझर आहे. रिकी केजने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासह अनेक प्रतिष्ठित ठिकाणी कामगिरी बजावली आहे. त्यांगी जगभरातील 30 देशात 100 पुरस्कार जिंकले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी