28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमुंबईआदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना गल्लीगल्लीत फिरायला लावणार

आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना गल्लीगल्लीत फिरायला लावणार

मुंबई महापालिका निवडणुकीचे नगारे सध्या वाजण्यास सुरुवात झाली असून, वरळीती शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक संतोष खरात यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि.७) वरळीत सभा (Worli rally) होत आहे. या सभेवरुन युवासेना प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर तोफ डागली आहे. वरळीत त्यांना गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी देखील विजय आपलाच होणार असे आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना ललकारले आहे.

आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा सुरु असून आज त्यांच्या यात्रेचा दुसरा दिवस आहे. नाशिकमधील चांदोरी येथील सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, पाठीवर वार करुन त्यांनी विरोधीपक्षात बसवले. वरळीतून लढणे जमत नव्हते, तर त्यांनी मला फोन करुन सांगायचे होते. मी ठाण्यात येऊन लढलो असतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना लगावला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. करण मोठ्या सभा घेतल्यास नागरिकांच्या जवळ जाता येत नाही. बुरा वक्त आया है, वो भी जायेगा असे म्हणत त्यांनी गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा खोके वाटले जातात पण तरीही खुर्च्या रिकाम्या असतात, असा टोला लगावला.

हे सुद्धा वाचा 

आमदार राम शिंदे यांनी आपला शब्द १५ दिवसांतच खरा केला

पाकिस्तानची माणूसकीला काळीमा फासणारी कृती; भुकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीला जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानाला परवानगी नाकारली

मुंब्राचे नाव मुंब्रा देवी करा, स्वतःचे नाव बदलल्यानंतर मोहित कंबोज यांची मागणी

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्याबाहेर उद्योग गेल्याचे दुःख नाही; पण राजकीय अस्थिरत्यामुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हते. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. आशीर्वाद तुम्ही मला द्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी जनतेला केले. पुढे बोलताना ते म्हणाले, सध्या गलिच्छ राजकारण सुरू असून हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता बोलता तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल; पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी