29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमुंबईमुंब्राचे नाव मुंब्रा देवी करा, स्वतःचे नाव बदलल्यानंतर मोहित कंबोज यांची मागणी

मुंब्राचे नाव मुंब्रा देवी करा, स्वतःचे नाव बदलल्यानंतर मोहित कंबोज यांची मागणी

खलील गिरकर : आपले स्वतःचे नाव मोहित कंबोज(Mohit Kamboj) बदलून मोहित भारतीय केल्यानंतर आता मुंब्राचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. मोहित कंबोज यांनी मुंब्रा चे नाव बदलून मुंब्रादेवी करावे, अशी मागणी ट्वीट द्वारे केली आहे. (Mohit Kamboj demands to Rename Mumbra as Mumbra Devi; after changing his own name)

मुंब्रादेवी मंदिराला मोठा इतिहास असून त्याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे, त्यामुळे मुंब्रा चे नाव बदलून मुंब्रादेवी करावे, अशी मागणी कंबोज-भारतीय यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीवर मुंब्रावासीयांची काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होता होता शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने देखील औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले व उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय घेतला. आता राज्यातील शहरांची नावे बदलण्याची मागणी करण्याचा ट्रेंड पुन्हा येण्याची शक्यता दिसू लागली आहे.

हे सुद्धा वाचा : शिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही – भाजपा

भले शाब्बास, शिवसेनेचा लय भारी गेम केला तुम्ही, असे तर मोदी हे शिंदे-फडणवीसांना सांगत नसावेत ना?

खासदारांच्या संपत्तीत कोट्यानुकोटीची उड्डाणे; सुप्रिया सुळेंची संपत्ती किती वाढली?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी