35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमअधिकाऱ्याने घेतली तब्बल ८.५ लाखाची लाच...

अधिकाऱ्याने घेतली तब्बल ८.५ लाखाची लाच…

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आहे.

वैजापूर येथे जलसंधारण विभागाचा उपविभागीय अधिकारी असलेला ऋषिकेश देशमुख या लाचखोर अधिकाऱ्याने हे कृत्य केले असून, त्याला गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आली आहे. अन्य एका कारवाईत गंगापूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau, Maharashtra) भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला ३० हजारांची लाच घेताना पकडले होते. (Government officer Rishikesh Deshmukh arrested in Aurangabad by Maharashtra ACB for accepting bribe)

एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथे उपविभागीय अधिकारी आहेत. जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. मात्र तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने सापळा रचून देशमुखला साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.

चौडेश्वरी कंट्रक्शन्स, परभणी या कंपनीच्या नावावर कोल्हापुरी बंधाऱ्याचे गवळी पिंपळी ता. सोनपेठ जि. परभणी येथील कामाचे देयक १८ लाख आणि गोविंदपूर, ता. पूर्णा, जि. परभणी येथील कामाचे देयक एक कोटी १९ लाख असे दोन्ही कामाचे मिळून तक्रारदाराचे एकूण एक कोटी ३७ लाख रुपयांचे देयक बाकी होते. हे सर्व देयक काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे साहेब यांच्यासाठी ७.५ टक्के प्रमाणे म्हणजेच ८ लाख ३ हजार २५० आणि स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून ५० हजार असे एकूण ८ लाख ५३ हजार २५० रुपयांची मागणी देशमुख यांनी केली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरगाबाद कार्यालयासमोर देशमुख आणि जलसंधारण महामंडळ कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत भाऊसाहेब दादाराव गोरे या दोघांना रंगेहात पकडण्यात यश आले.

गंगापुरातील ‘भूमी अभिलेख’ प्रकरण काय?

गंगापूर येथील कारवाईत भूमी अभिलेख विभागातील उप अधीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक साळोबा लक्ष्मण वेताळ (५१) कार्यरत आहे. तक्रारदाराने आपली शेती मोजणी करण्यासाठी गंगापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मात्र जमीन मोजण्यासाठी साळोबा वेताळ यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून पंचासमक्ष ३० हजार रुपये घेताना साळोबा लक्ष्मण वेताळ याला रंगेहात पकडले. वेताळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी