29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमुंबईआमदार राम शिंदे यांनी आपला शब्द १५ दिवसांतच खरा केला

आमदार राम शिंदे यांनी आपला शब्द १५ दिवसांतच खरा केला

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी मतदारसंघातील अनेक विकास कामे शासन दरबारी ठेवली होती. जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्याकडे सरकारचे लक्ष केंद्रित केले होते. अखेर त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दरम्यान आमदार शिंदे यांनी 15 दिवसांपूर्वी दिलेला शब्द पाळल्यामुळे जनतेमध्ये देखील संतोषाचे वातावरण आहे. (MLA Ram Shinde fulfilled his promise within 15 days)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Social Development Schemes) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून कर्जत-जामखेड मतदारसंघातील 16 गावांसाठी 4 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. निधी मंजुर होताच मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विकास योजनेंतर्गत जामखेड तालुक्यात मंजुर झालेली कामे आणि निधीमुळे अनेक दलित वस्तींमध्ये सामाजिक भवन आणि बौध्द विहार उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विविध विकास कामे व्हावीत, यासाठी आमदार शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. फडणवीस यांनी तातडीने या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला निधी मंजुर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित विभागाने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल 4 कोटींचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये जामखेड तालुक्यासाठी दीड कोटी तर कर्जत तालुक्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजुर झाला आहे.

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांनी जामखेड शहरात नुकत्याच पार पडलेल्या संविधान महोत्सवात बोलताना कर्जत-जामखेड मतदारसंघात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून भरीव निधी देण्याची घोषणा केली होती. तद्नंतर 15 दिवसाच्या आतच आमदार शिंदे यांनी जामखेडमध्ये दिलेला शब्द पळल्यामुळे त्यांच्या धडाकेबाज कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधा-यांचा डाव : नाना पटोले

माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार का?

मराठ्यांना ओबीसींच्या सर्व सवलती लागू राहणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आमदार शिंदे यांनी पुन्हा एकदा विकास कामे मार्गी लावण्याकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे मतदारसंघात पुन्हा एकदा शिंदे पर्व सुरु झाल्याची चर्चा आहे. आमदार शिंदे यांनी मंत्री असताना मतदारसंघात प्रचंड विकास कामे खेचून आणली होती. आताही शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमांतून आमदार शिंदे यांनी विकास कामे घडवून आणण्याची मोहीम सुरु केली आहे. आमदार शिंदे यांच्या माध्यमांतून मतदारसंघातील 16 गावांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेचा भरीव निधी मंजुर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेमध्ये तसेच दलित समाजासह भीमसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी