31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रके. सी. वेणूगोपाल नाना पटोले यांच्या खिशात : आशिष देशमुख

के. सी. वेणूगोपाल नाना पटोले यांच्या खिशात : आशिष देशमुख

महाराष्ट्र काँग्रेसमधील (Congress) पक्षांतर्गत दुही काही दिवसांपुर्वी समोर आल्यानंतर दिल्लीकडून त्याची दखल घेत याबाबत एक सदस्यीय समिती स्थापन करुन त्याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वादामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. नागपूरमधील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी पटोलेंवर जोरदार हल्लाबोल करत ही कमिटी कोवळ फार्स असून के.सी. वेणूगोपाल हे नाना पटोले यांच्या खिशात आहेत असा आरोप केला आहे. (Ashish Deshmukh criticizes Nana Patole)

आशिष देशमुख म्हणाले, अखील भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटक के.सी. वेणूगोपाल यांनी रमेश चेनिथला यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय कमिटी महाराष्ट्र काँग्रेसच्या सद्यस्थितीबद्दल आणि सुरु असलेल्या वादाबद्दल नेमली आहे. के.सी. वेणूगोपाल हे नाना पटोले यांच्या खिशात आहेत. जेव्हा नाना पटोले भाजपमधून काँग्रेसमध्ये आले तेव्हा पासून चार वर्षात त्यांना आठ-आठ पदे त्यांना वेणूगोपाल यांच्या माध्यमातून त्यांना काँग्रेसमध्ये मिळाली. त्यांचा प्रवेश झाल्याबरोबर त्यांना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केले. त्यानंतर अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष केले, त्यानंतर नागपूर लोकसभेची उमेदवारी दिली, त्यानंतर विधानसभा निवडणूकीदरम्यान त्यांना राज्याचे प्रचारप्रमुख केले. त्यानंतर विधानसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद देखील दिले. एवढेच कमी काय त्यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देखील करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

नाना पटोलेंचे कारस्थान कॉंग्रेसच्या मुळावर, बाळासाहेब थोरातांचा राजीनामा !

आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबेंची पहिलीच पत्रकार परिषद; नाना पटोले, एच.के. पाटलांवर डागली तोफ

आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबेंची पहिलीच पत्रकार परिषद; नाना पटोले, एच.के. पाटलांवर डागली तोफ

महाविकास आघाडी शाबूत राहिले असते तर के. सी. वेणूगोपाल यांनी पटोले यांना नक्कीच मंत्री केले असते. के. सी. वेणूगोपालांकडून पटोले यांच्याकडून इतक्या मोठ्याप्रमाणात पटोले यांचे ला़ड होत असताना या कमिटीचा कोणताही फायदा होणार नाही, नेमलेली कमिटी केवळ फार्स आहे, त्यामुळे नाना पटोले यांची उचलबांगडी होईल या मताचा मी नाही असे आशिष देशमुख यावेळी म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी