29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रदत्तात्रय भरणे - हर्षवर्धन पाटील येणार एकत्र !

दत्तात्रय भरणे – हर्षवर्धन पाटील येणार एकत्र !

इंदापूर तालुक्याचे दोन दिग्गज नेते भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) आज एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इंदापूरचे ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महादेवाचा शुक्रवारी (दि.१७) रोजी भव्य रथोत्सव पार पडत आहे. या रथोत्सवासाठी हे दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता असून ते दोघेही रथाचे दोर ओढतील अशी शक्यता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. (Dattatraya Bharne – Harshvardhan Patil likely to gather for Rathotsava In Indapur)

इंदापूरचे ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महादेवाची यात्र ही भव्यदिव्यपणे साजरी होत असते. दिनांक १४ फेब्रुवारी पासून या सोहळ्यास सुरुवात झाली असून गेले तीन दिवस ही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. गावातील तसेच परिसरातील भाविक मोठ्यासंख्येने रथोत्सवासाठी उपस्थित राहत असतातय देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा रथोत्सवाचा सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात पार पडतो. आज या रथोत्सव सोहळ्याला हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे दोघेही उपस्थित राहण्याची शक्यता दोन्ही गटाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते रथाचे दोरखंड ओढतील अशी देखील चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

कौतुकास्पद: बाळंतपणाच्या वेदनादायक प्रक्रियेतून जावूनही ‘ती’ने दिली बोर्डाची परीक्षा!

…तर सरकार वाचले असते; ‘वंचित’ची संजय राऊतांवर टीका

उत्तराखण्डमधील दुर्गम भागातील क्षयग्रस्त रुग्णाला ड्रोनमार्फत औषधांची एअर डिलिव्हरी

आजच्या या ग्राम यात्रा व रथ उत्सव सोहळ्यात देवाच्या रथाचा दोरखंड ओढण्याची प्रथा आहे. दरवर्षी ग्रामस्थ हा दोरखंड ओढतात व गावाला ग्राम प्रदर्शना घातली जाते. या सोहळ्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतील आणि दोघेही रथाचे दोरखंड ओढतील अशी शक्यता आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी