32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद झाला पण...; राऊतांचे चिमटे

मुख्यमंत्री शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद झाला पण…; राऊतांचे चिमटे

डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्यी दीक्षांत समारोहात काल (मंगळवार, 28 मार्च रोजी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विद्यापीठाकडून डी.लीट पदवी देत सन्मानित करण्यात आले आहे. शिंदे यांना डॉक्टरेट मिळाल्याने त्यांचं सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही शिंदे यांचं अभिनंदन करतानाच त्यांना टोलेही लगावले आहे. एकनाथ शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद आहे. पण त्यांनी आता स्वत:वरच शस्त्रक्रिया केली पाहिजे, असा चिमटा काढतानाच वीर सावरकर हे कोणत्या बोटीतून कोणत्या बंदरावर गेले होते. हे डॉक्टरांना आताच फोन करून विचारा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान ही पदवी बहाल करताना कुलपती विजय पाटील म्हणाले, तुम्ही आता डॉ. एकनाथ शिंदे होणार. पण, यापूर्वीच मी डॉक्टर झालोय. छोटीमोठी ऑपरेशन करत असतो. समाजात इतके वर्ष काम करतोय. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो आहे, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले, यावर विरोधक खासदार संजय राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद झाला पण...; राऊतांचे चिमटे

ऑपरेशनबाबत आम्हाला काय सांगू नका. आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत बसा. तुम्हाला मुका मार बसल्याशिवाय राहणार नाही. देशाला अनुभव आहे की, प्रत्येक भ्रष्टाचार करणाऱ्यांना डॉक्टरेट मिळते. खरतर डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी व्हायला हवी. ज्यांच्यावर भ्रष्टाचार गैरव्यवहारांचे गुन्हे दाखल असलेल्यांना कशी काय ही पदवी मिळते, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधान केले होते की, ठाकरेंपेक्षा मी गर्दी जमवली आहे. या विधानावरुन राऊत यांनी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला. अशा लोकांना घेवून मिंदे गट फिरत आहे. जे लोक बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहेत. तानाजी सावंत यांनाही डॉक्टरेट दिली पाहिजे. असं म्हणत शिंदे गटासह सावंत यांच्यावर निशाणा साधला.

हे सुद्धा वाचा :

शिंदे-फडणवीसांची ‘सावरकर गौरवयात्रा’ म्हणजे ‘अदानी बचाओ यात्रा’; राऊतांचा निशाणा

राज्यात ‘मुका घ्या मुका’ सिनेमा चालू आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

सावरकर गौरव यात्रा अन् राहुल गांधींचा निषेध – एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी