28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्राईमहनुमान चालीसा प्रकरण : राणा दाम्पत्याना कोर्टाने फटकारले

हनुमान चालीसा प्रकरण : राणा दाम्पत्याना कोर्टाने फटकारले

हनुमान चालिसा प्रकरणात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांची न्यायालयात पुन्हा गैरहजेरी लावली. यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली. राणा दाम्पत्याला पुन्हा कोर्टाचे फटकारले.

खासदार नवनवीन राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालींसा पठणाच आंदोलन केलं होतं. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.त्याचा खटला आता सुरू झाला आहे. या खटल्याच्या वेळी बऱ्याचदा राणा पती पत्नी हजर राहत नाहीत.आज ते सुनावणीच्या वेळी हजर राहिले नाहीत. यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली. हे काय चाललेय? सत्र न्यायालयाने वकिलांना असा संतप्त सवाल केला.

हे सुद्धा वाचा 

बारसू रिफायनरीला कुणबी समाजाचा विरोध

मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव

हेट स्पीच; तक्रार नसेल तरी गुन्हा नोंदवून घ्या; नपुसंक सरकारला सुप्रीम कोर्टाचे आदेश

पुढील सुनावणीला हजर राहणार याची हमी द्या, अन्यथा आम्ही आदेश जारी करू,अस ही कोर्टाने फटकारले.कोर्टाने फटकारल्यानंतर राणा दाम्पत्याच्या वकिलांनी पुढच्या सुनावणीला ते नक्की हजर राहतील अशी लेखि हमी दिली. आधी राणा दाम्पत्याच्या वकिलांनी लेखी हमी देण्यास नकार दिला होता. मात्र, कोर्ट संतप्त झाल्याचं पाहून त्यांनी लेखी हमी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी