32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणबारसू रिफायनरीला कुणबी समाजाचा विरोध

बारसू रिफायनरीला कुणबी समाजाचा विरोध

रत्नागिरी येथील बारसू गावामध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी विरोधाची आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढत असून बारसू तीरठ्यावर सुरु असलेल्या आंदोलकांच्या अवस्था पाहता दैनीय आहे. त्या रिफायनरीच्या प्रकल्पा विरोधात आज म्हसळा तालुक्यातील कुणबी समाजाने आणि कुणबी व्यापारी वाहतूक संघाने तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना लेखी रिफायनरी विरोधात निवेदन दिले आहे.

तर कुणबी समाज नेते बळीराज सेना अध्यक्ष अशोकदादा वालम यांना चुकीच्या मार्गाने दडपशाही चा वापर करत हिटलरशाही दाखवत कोणतेही कारण नसताना केवळ शेतकऱ्यांच्या बाजूने लढा देत असल्याकारणाने राजकीय सुडापोटी अटक केली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ मुक्त करावी नाहीतर संपूर्ण कोकणात जागोजागी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

यावेळी निवेदन देण्यासाठी कुणबी समाज तालुका उपाध्यक्ष दिलीप मांडवकर, तालुका चिटणीस गणेश बोर्ले, राजाराम तिलाटकर, खजिनदार मोहन शिंदे, कार्यालयीन चिटणिस महेंद्र धामणे कुणबी व्यापारी वाहतूक संघ अध्यक्ष महेश पवार, उपाध्यक्ष संतोष जाधव, कुणबी समाज उत्तर मध्य अध्यक्ष लहू तुरे, व्यापारी वाहतूक संघ विभाग अध्यक्ष महेश धाडवे, आकाश मोरे, केतन आग्रे, संदीप जाधव कार्यालयीन चिटणीस, दिपेश जाधव, दिलीप कोबनाक किरण मोरे, गणेश भुवड, रवी राणे, तालुका सचिव सुभाष कदम, खजिनदार राजेंद्र पदरत, नथुराम केंद्र, अरविंद शिंदे, जयेश जाधव, विकास पोटले, संतोष पाखड, नितीन कदम, नितेश दिवाळे, संदीप कोबनाक, तुकाराम चव्हाण, जितु गीजे, व असंख्य कुणबी बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव

हेट स्पीच; तक्रार नसेल तरी गुन्हा नोंदवून घ्या; नपुसंक सरकारला सुप्रीम कोर्टाचे आदेश

आप्पा धर्माधिकारी “महाराष्ट्र भीषण” कार्यक्रमात उष्माघात नव्हे चेंगराचेंगरीचे बळी; प्रथमच प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती

त्यावेळी कुणबी समाज तालुका नेते दिलीप मांडवकर यांनी रिफायनरी आणि अशोक वालम यांना त्याच्यावर केलेल्या कारवाई बाबत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बोलताना म्हणाले की, कोकण हे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. कोकणाचे जतन करण्याएवजी हे हिटलर शाही सरकार कोकण उद्वस्थ करत आहे. त्या सरकारला जाग आणल्याशिवाय आम्ही कोकणवाशी स्वस्थ बसणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी