31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयशरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय मागे; पक्षाध्यक्षपदी कायम राहणार

शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय मागे; पक्षाध्यक्षपदी कायम राहणार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. मात्र पक्षातील कार्यकर्ते, नेते, माझे हितचिंतक यांनी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी पून्हा घ्यावी अशी मागणी केली. त्या सर्वांचा मान राखून मी माझा निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.

शरद पवार म्हणाले. दि. 2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्तीची निर्णय घेतला होता. सार्वजनिक जीवनातील 63 वर्षाच्या कारकिर्दीनंतर सर्व जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय़ घेतला होता. पण मी घेतलेल्या निर्णयामुळे जणमाणसात तीव्र भावना होती. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्मान झाली. मी निर्णयाचा फेर विचार करावा या किरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रमे,विश्वास असणारे कार्यकर्ते, चाहत्यांनी एकमताने माला आवाहन केले. त्याचवरोबर देशभरातून, महाराष्ट्रातून विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पून्हा घ्यावी अशी मागणी केली.

लोक माझे सांगाती हे माझ्या सार्वजनिक समाधानी जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी सर्वांनी केलेली आवाहने, तसेच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेल्या निर्णय़ या सर्वाचा विचार करुन मी पून्हा अध्यक्षपदी राहण्याच्या निर्णयाचा मान राखून मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे, असे पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नरेंद्र मोदींचा कर्नाटक प्रचारात ‘द केरळ स्टोरी’ च्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर घणाघात

तब्बल 15 वर्षांनंतर आमिर करतोय ‘गजनी’च्या सिक्वेलची तयारी!

IPS अधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

शरद पवार म्हणाले, मी अध्यक्षपद स्विकारतोय आणि जरी संघटनेतील उत्तराधिकारी निर्मान होणे आवश्यक असते. मी नवे नेतृत्त निर्मान करेन या संदर्भात सहकाऱ्यांचा विचार करुन नवे नेतृत्व सोपवण्यावर भर असेल. यापूढे पक्षवाढीसाठी पक्षाची विचारधारा जनमाणसात पोहचविण्यासाठी अधिक जोमाने काम करेन. आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. आपण माझ्या सांगाती राहिलात याबद्दल मी आपला आभारी राहीन. मी पक्षाची जबाबदारी स्विकारत असल्याचे जाहीर करतो.

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी