29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeएज्युकेशनचंद्रकांत पाटलांच्या खात्याविरोधात अभाविपने फुंकले रणशिंग !

चंद्रकांत पाटलांच्या खात्याविरोधात अभाविपने फुंकले रणशिंग !

मुंबईतील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीची 6 जून रोजी हत्या झाली. ही घटना ही पूर्णपणे वसतिगृह प्रशासन व उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबईच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे झाली असल्याचे लक्षात येते, त्यांमुळे घटनेचे वसतिगृह प्रशासन व उच्च व तंत्रशिक्षण विभाग ने पूर्ण जबाबदारी घेऊन प्रकरणातील सर्व दोषींवर तत्काळ कठोर कारवाईकरण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकात पाटील असल्याने आता अभविपने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातच रणशिंग फुंकले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील सहसंचालक उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. विद्यार्थ्यांना उत्तरदायी असणारे हे कार्यालय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे, तसेच ढिसाळ कारभारांच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याचा आव आणत मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अभविपने केला आहे.

आज पाहिले तर महाराष्ट्रभरातील सर्व महिला वसतिगृहाची कारभार असेच असल्याचे लक्षात येते. त्यामुळे अभविप सर्व वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विचार करून सदर घटनेतील सर्व दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई कारवाई करावी, सर्व वसतिगृहांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, सर्व वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशा मागण्या अभविपने केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे – शरद पवार

विद्यापीठे रँकिंग यादीत येण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंडळाला दिले धडे

पुण्यातील IAS अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात; आठ लाखांची लाच घेताना पडली धाड  

त्याचबरोबर सदर घटनेच्या बळी पडलेल्या पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी व झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्रव्यापी जन आंदोलन पुकारेल, असा इशारा अभाविप मुंबई महानगर सहमंत्री जतिन शाह यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी