29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeक्रिकेटतरच भारत उपांत्य फेरीत जाणार, काय आहेत समीकरणे?

तरच भारत उपांत्य फेरीत जाणार, काय आहेत समीकरणे?

आयसीसी वनडे क्रिकेट विश्वचषकात भारत चांगली कामगिरी करत आहे. हा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट तज्ञांनी भारताबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. भारत हा उपांत्य फेरीत जाणारा संघ आहे असे देखील बोलले जात आहे. त्याचप्रमाणे भारत हा यंदाच्या विश्वचषकातील आवडता संघ असल्याची चर्चा अधिक पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकातील 3 सामने जिंकत पॉइंट्स टेबलवर 6 गुण मिळवले आहेत. यामुळे आता विश्वचषकात भारताचे स्थान हे पहिल्या क्रमांकावर आले आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने अफलातून कामगिरी केली. त्याबरोबर भारताविरुद्ध खेळणाऱ्या संघाला अजून कसून सराव करावा लागणार आहे. कारण भारताची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण वाखडण्याजोगी आहे. सध्याचा सुरू असलेला विश्वचषक भारतात असून याचा फायदा हा भारतीय संघाला होत आहे. भारतीय संघ देखील याच संधीचे सोने करत आहे. खेळाडूंचा विचार केला तर शुभमन गिल हा काही दिवस झाले आजारातून बाहेर आला आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज देखील चांगली कामगिरी करत आहेत. यामुळे यंदा भारताला उपांत्य फेरीत जाणे शक्य होईल.

हेही वाचा

महादेव, टोकरे, मल्हार कोळयांच्या जात प्रमाणपत्रासाठी नीलम गोऱ्हे आग्रही

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घ्यायला ‘सर्वोच्च’ होकार

दादरमध्ये शिंदे-ठाकरे गटात फेसबुक पोस्टवरून हमरातुमरी

या संघांसोबत होणार आगामी सामने

भारताचे आणखी 6 सामने शिल्लक आहेत. न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड या 6 संघांसह खेळावे लागणार आहेत. यात 3 सामने जरी भारताने जिंकले तर भारत उपांत्य फेरीच्या जवळपास जाईल. जर 4 सामने भारताने जिंकले तर भारत उपांत्य फेरीच्या सामन्यात आपले स्थान पक्के करू शकतो. मात्र असे असताना भारताला दोन दिग्गज संघांचे आव्हान असू शकते.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे मोठे आव्हान

भारत हा सध्या वनडे विश्वचषकात जरी चांगली कामगिरी करत आहे. मात्र तरीही भारताला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ मात देऊ शकतात. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ उपांत्य फेरीपर्यंत आले आहेत. या दोन्ही संघात उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकांचा भरणा असलेला संघ असल्याने हे दोन संघ भारताला आव्हान देऊ शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी