मलायका अरोरा हे नाव घेतले तरी तिचे चाहते घायाळ होतात. मलायका कायम तिच्या X आणि इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. त्यावर तिचे रीळ आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यातील दोन व्हिडीओ सध्या जबरदस्त व्हायरल झाले आहेत. मलायक म्हणजे प्रेमदिवाणी, मलायक म्हणजे सौंदर्याची व्याख्या, मलायका म्हणजे परफेक्ट फिगर. आता तुम्ही म्हणाल, असं काय झालं की मलायक अरोराचं एवढं गुणगाण गायलं जातंय? तर पहिली बाब लक्षात घ्या ते मलायकाचं वय! आता पुन्हा नवी चर्चा नको, अगदी स्पष्टच सांगायचं तर मलायकचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. अगदी धुमधडाक्यात साजरा झाला. त्यावेळी अर्जुन कपूरने शेअर केलेला फोटोही चर्चेत राहिला.
तर आता मुद्द्यावर येऊया, मलायकचे दोन व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेत आणि तिचे चाहतेही तिच्यावर जाम फिदा झाल्याचे दिसत आहेत. यातील पहिला व्हिडीओ आहे तो इन्स्टाग्रामवरील. या व्हिडीओत दिसते ते मलायका अरोराचं मराठमोळं रूप. ‘पिंगा ग पोरी…’ हे बॅकग्राऊंडला सुरू असलेलं गाणं समोर साक्षात सौंदर्याची मलिका मलायका अरोरा. हा व्हिडीओ कुणीही पाहिला तो मलायकच्या प्रेमात पडेल.
View this post on Instagram
यातील मलायका अरोरा इतकी सुंदर दिसते की, काही विचारू नका. आता साक्षात रुप की देवी मलायका समोर असताना दुसरीकडे पाहायचं भान कुणाला राहिल?
यानंतरचा मलायका अरोराचा दुसरा व्हिडीओ आहे तो जरा सांभाळूनच पाहा बरं का! कारण हा व्हिडीओ पाहून तुमच्या हृदयाची धडधड वाढू शकते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तिच्यापेक्षा लहान असलेला अर्जुन कपूर मलायकाच्या प्रेमात कसा आकंठ बुडाला.
#Malaika Arora ❤️#MalaikaArora #MalaikaAroraSutra #desisutra pic.twitter.com/LVNeOLPb0y
— Desi Sutra ❤️ (@iDesiSutra) October 25, 2023
आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला मलायका अरोराच्या वयाचा अंदाज आला असेलच. अहो नाही, ती २५-२६ वर्षांची नाही तर चक्क ४८ वर्षांची आहे. नुकताच तिने तिचा ४८वा वाढदिवस साजरा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. वय वाढतंय तरीही मलायकी फिटनेस जपतेय. कदाचित त्यामुळेच मलायकाचं सौंदर्य म्हणूनच दिवसेंदिवस आणखी खुलतंय..!