30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयवडेट्टीवारांना धमकीचे फोन; सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी

वडेट्टीवारांना धमकीचे फोन; सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी

राज्यात मराठा आरक्षणावरून वाद-विवाद सुरू आहेत. मराठा आरक्षणासाठी काही नेते अडवणूक करत असल्याने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. आंदोलने आणि मोर्चे देखील काढले होते. तर मराठा समाजाने आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसह काही दिवसांआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी मराठा समाजाला आरक्षणाविरोधात भूमिका घेतली. यामुळे आता ते चांगलेच गोत्यात आले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटलांच्या (Manoj jarange-Patil) विरोधात भूमिका घेतल्याने वडेट्टीवारांना धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, वडेट्टीवरांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (EknaTh Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) त्यांनी सुरक्षा वाढवण्याबाबत सांगितले आहे. त्यांनी पत्राद्वारे ही माहिती सांगितली आहे. फोन आणि मेसेजच्या माध्यमातून धमकी दिली आहे. ज्या व्यक्तीने धमकी दिली आहे, त्यावर गृह विभागाने गांभिर्याने दखल घेतली असल्याची माहिती समोर आली. धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करु अशी माहिती पोलिस आधिकाऱ्यांनी दिली आहे.

वडेट्टीवारांनी धमकी दिल्याबाबत मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. फोनवरून धमकी दिल्याने काही कॉल रेकॉर्ड्स पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. वरिष्ठ आधिकाऱ्यांनी वडेट्टीवारांच्या सुरक्षेचा आढावा घेत, धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे. सध्या वडेट्टीवारांना वाय प्लस सुरक्षा तैनात केली आहे. तीन शिपाई आणि एक वाहन तैनात केले आहे. लवकरच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असून गृहविभाग आपल्या कामाशी तत्पर भूमिका बाजावत आहे.

हे ही वाचा

‘छगन भुजबळांना मतदान करणार नाही’

‘जगाला माहितीये की माझी जात कोणती आहे; मी लपवू शकत नाही’

‘मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामाचे दर्शन घ्या’; भाजपकडून ऑफर?

काय आहे नेमकं प्रकरण?

वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांना कुणबी प्रमाणपत्र न देण्याबाबत भाष्य केले होते. हा केलेला प्रकार आता वडेट्टीवारांच्या अंगलट आला आहे. यामुळे त्यांना राज्यभरातून धमक्यांचे फोन येत आहेत. जरांगेच्या भूमिकेविरूद्ध वडेट्टीवार आपले मत मांडत होते. जरांगे पाटील हे समाजाची दिशाभूल करत आहेत, असे वडेट्टीवारांनी मराठा आरक्षण आणि जरांगेविरोधात वक्तव्य केले होते. यावर आता राज्यातून धमकीचे फोन येऊ लागल्याने सरकारला धमकीची माहिती वडेट्टीवारांनी दिली आहे. या घडलेल्या प्रकारणानंतरही वडेट्टीवार मराठा आरक्षणाच्याविरोधात भूमिका घेणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी