29 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीय'नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेसाठी दाखल'

‘नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेसाठी दाखल’

(२२ नोव्हेंबर) दिवशी राज्य परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवी पत्नीसाठी जिल्ह्याच्या ठिकठिकाणच्या बसस्थानकावर स्टॅाल लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधांसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेसाठी दाखल होणार असल्याची मंजुरी एकनाथ शिंदेंनी दिली आहे. बसस्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देऊन त्याचा चेहरा मोहरा बदलावा. सामान्य नागरिकांना बससेवेच्या माध्यमातून उत्तमोत्तम सेवा एसटी महामंडळाने द्यावी. जेणेकरून प्रवास सुखकर होईल असे एकनाथ शिंदे संचालक मंडळ बैठकीत म्हणाले आहेत.

२० नोव्हेंबर एका दिवशी ३६.७३ कोटी रूपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केलं आहे. यावेळी २२०० साध्या बसेस विकत घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिली आहे. यामुळे २०२४ या वर्षात २२०० साध्या बसेस महामंडळाच्या ताफ्यात येतील. एसटीच्या वेगवेगळ्या विभागासाठी १२९५ साध्या बसेस भाडेतत्वावर देण्यासाठी मान्यता दिली आहे. सामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखना सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील बसस्थानकांवर दवाखाना सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

हे ही वाचा

सिम कार्ड ऐवजी आता येणार ई-सिम

धर्मरावबाबा आत्रामांच्या निर्देशाने मुंबई आणि नवी मुंबईत गुटखा विक्रीवर चाप

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात ३०० रूपयांसाठी मुलाला निर्वस्त्र मारहाण

येत्या दोन वर्षात एसटी बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर सेवा देण्यात येणार आहे. या बसेसकरीता समान्यांच्या खिशाला परवडेल असेच तिकिट दर ठेवण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी दिले आहे. त्याचप्रमाणे माजी सैनिकांच्या विधवा महिलेसाठी आणि दिव्यांगांसाठी स्टॉल सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.

काही योजनांचा समावेश

परदेशी योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला आहे. महिलांना आरोग्याच्या तपासणासाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी