32 C
Mumbai
Thursday, February 15, 2024
Homeमुंबईसिम कार्ड ऐवजी आता येणार ई-सिम

सिम कार्ड ऐवजी आता येणार ई-सिम

सिम कार्ड आणि मोबाईल या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर सिम कार्ड नसेल तर आपल्याला माणसांपर्यंत पोहोचणं अवघडच होऊन बसतं. तर यामुळे त्या मोबाईलला म्हणावा तसा अर्थ उरत नाही. म्हणून सिम कार्ड हा माणसाच्या आयुष्यातील घटक आहे. तंत्रज्ञानात नवनवीन ट्रेंण्ड आणले जात आहेत. 4g वरून आता 5g सिम कार्ड आणले गेले. अशातच आता ई-सिमने (E-Sim card) लक्ष वेधले आहे. मात्र याचा वापर हा सिम कार्डहून अधिक सकारात्मक आणि फायदेशीर होणार आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानही बदलू लागले आहे. आता यासाठी ग्राहकांना सिम कार्ड काढून  मोबाईलमध्ये बसवण्याची आवश्यकता नाही. एका क्लिकवर सर्व कॉलिंग, एसएमएस करता येणार आहे. लवकरच ई-सिमचे युग अवतरेल, असे एअरटेलचे सीईओ गोपाळ विट्टल यांनी माहिती दिली.

सिमकार्डहून ई-सिम चांगला पर्याय असल्याची माहिती गोपाळ यांनी दिली आहे. सिमकार्डहून आता ई-सिम ग्राहकांनी विकत घ्यावे यासाठी आवाहन करत आहे. स्मार्टफोन कंपन्या आणि डेटा डिव्हाईस कंपन्या यावर पर्याय देत आहेत. चोरी होणाऱ्या प्रकाराला आळा बसू शकतो. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

हे ही वाचा

धर्मरावबाबा आत्रामांच्या निर्देशाने मुंबई आणि नवी मुंबईत गुटखा विक्रीवर चाप

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात ३०० रूपयांसाठी मुलाला निर्वस्त्र मारहाण

‘कोणाची जमीन खाल्ली, बंगले हाडपले, मला शांत राहू दे…’ मनोज जरांगेंचा भुजबळांवर एकेरी उल्लेख

चोरी होण्यापासून आळा

सिमकार्ड चोरीला गेल्याचे, फेकून दिल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. या सिम चोरीमुळे बऱ्याचदा सर्व मोबाईल सिममधील डेटा जातो. काही महत्वाचे कॉन्टॅक्ट पुन्हा मिळवता येणं कठीण होऊन जातं. चोरटे मोबाईल चोरी करतात आणि सिमकार्ड फेकून देतात, तोडतात, नाहीसे करतात मात्र आता ई-सिममुळे असे होणार नाही. या ई-सिममुळे चोरीवर आळा बसू शकतो. लोकेशन कळू शकते, मोबाईल ट्रॅक करू शकतो.

ई-सिममुळे एकाचवेळी स्मार्टवॉच, एकाच मोबाईलपासून सर्व मोबाईलला जोडता येईल. ग्राहकांना सर्व दूरसंचार सेवा मिळतील. मोबाईल ऐवजी स्मार्टवॉचचा किंवा इतर मोबाईलला कनेक्ट करून ई-सिमचा वापर करता येतो. दरम्यान, जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्या ई-सिमचा पर्याय देत आहेत.

यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ई-सिम सेवेसाठी पर्याय आहे का हे पाहा. आपल्या मोबाईलमध्ये फीचर्स ओळखून हा निर्णय घ्या. मोबाईलला ई-सिम सपोर्ट करत असेल तर टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी