25 C
Mumbai
Friday, February 16, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंच्या ठाण्यात ३०० रूपयांसाठी मुलाला निर्वस्त्र मारहाण

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात ३०० रूपयांसाठी मुलाला निर्वस्त्र मारहाण

राज्यात सध्या संताप सुरू आहे. अशा स्थितीत ठाणे जिल्ह्यात कळवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आर्थिक देवाण-घेवाणीतून घडली असून या घटनेची राज्यभर चर्चा आहे. ३०० रूपये न दिल्याने एका अल्पवयीन मुलाला निर्वस्त्र करून मारहाण केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी दोघांविरोधात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरूणाने एकाकडून उसने पैसे घेतले. ते पैसे न दिल्याने मुलाला निर्वस्त्र केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उसने पैसे दिल्यानंतर आरोपी पैसै घेतलेल्या मुलाला सतत पैसे मागत असायचा त्या मुलाकडे उसने पैसे नसायचे तो पैसे देण्यास टाळाटाळ करायचा.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी या प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. उसने पैसे घेतलेल्या मुलाने पैसे परत करायचे नाव घेतले नाही. यावेळी आरोपी सतत मुलाला पैसे मागत असायचा, म्हणून आरोपीने उसने पैसे घेतलेल्या मुलाकडून ब्लूटूथ इयरफोन घेतले. यावेळी घेतलेले इयरफोन आरोपीच्या आईने उसने पैसे घेतलेल्या मुलाला दिले. मात्र यावेळी आरोपीला कळताचा आरोपी रागाने लालबुंद झाला.

हे ही वाचा

‘कोणाची जमीन खाल्ली, बंगले हाडपले, मला शांत राहू दे…’ मनोज जरांगेंचा भुजबळांवर एकेरी उल्लेख

‘सरकारकडून बेरोजगारांना सबुरीचे गाजर’ वडेट्टीवारांचा सरकारवर संताप

‘खेळाडू राजकीय नेत्यांहून अधिक शिस्तप्रिय’

आरोपीने मित्रालासोबत घेत उसने पैसे घेतलेल्या मुलाच्या घरी आला. यावेळी त्याच्यावर हल्ला केला. त्याला मारहाण करत निर्वस्त्र केले होते, ही घडलेली परिस्थिती लक्षात घेता. उसने पैसे मागितलेल्या मुलाच्या आईने त्या दोन मुलांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घडलेल्या घटनेचा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर शेअर केला असून मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात १७ वर्षीय मुलाला भर रस्त्यात निर्वस्त्र करून दोन जणांनी मारहाण केली असून अंधारेंनी एकनाथ शिंदेंविरोधात आवाज उठवला आहे.

काय म्हणाल्या अंधारे?

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात फक्त ३०० रूपये परत दिले नाही म्हणून १७ वर्षीय मुलाला भर रस्त्यात निर्वस्त्र करून दोन जणांनी मारहाण केली. सर्वसामान्यांचे सरकार म्हणवणाऱ्या या सरकारमध्ये गोरगरिबांची व्यक्ति प्रतिष्ठान काहीच नाही का? असा सवाल आत सुषमा अंधारेंनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी