विवेक बिंद्रे (Vivek Bindra) हे देशातील प्रसिद्ध मोटीव्हेशनल स्पीकर आहेत. बिंद्रा हे नेहमीच कोणत्या न् कोणत्या करणांसाठी प्रसिद्ध असतात. काही दिवसांआधी संदीप महेश्वरी या मोटीव्हेशनल स्पीकरने (Motivational Speaker) विवेक बिंद्रावर टीका केली होती. त्यामुळे बिंद्रा आणि महेश्वरी दोघंही अधिकाधीक चर्चेत आल्याचं पाहायला मिळालंं आहे. अशातच आता विवेक बिंद्राने आपल्या दुसऱ्या पत्नीवर हात उचलल्याची घटना घडली आहे. यामुळे तिच्या कानाला दुखापत झाली असून कानाचा पडदा फाटला आहे. विवेकविरोधात नोएडामध्ये एफआरआय (FIR) नोंदवली आहे. यामध्ये आपल्या पत्नीला त्याने शिवीगाळ केली असून कुलूप लावून मारहाण केली असल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहे एफआरआयमध्ये
एफआरआयमध्ये विवेक बिंद्रावर आरोप करण्यात आले आहेत. त्या दोघांचं लग्न ६ डिसेंबर दिवशी विवाह झाला असून ८ डिसेंबर दिवशी विवेकने आपली पत्नी यानिकाला मारहान केली आहे. त्यानंतर यानिकाला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. घडलेल्या घटनेप्रकरणी यानिकाचा भाऊ वैभवने (१४ डिसेंबर) सेक्टर १२६ पोलीस ठाण्यात जाऊन विवेकविरोधात तक्रार दाखल केली. पत्नी यानिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
Wife of famous motivational speaker and businessman Vivek Bindra.
#Noida #vivekbindra pic.twitter.com/vQsvDDoidX— Komal (@kmlpaulkmlx) December 22, 2023
हे ही वाचा
‘मी माफी मागणार नाही’
उद्धव आणि राज एकत्र; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
अर्जुन पुरस्काराचा मानकरी मोहम्मद शमी
पत्नीला मारण्याचं कारण आलं समोर
८ डिसेंबर दिवशी विवेकचा आणि त्याच्या आईचा वाद झाला होता. यावेळी बायको यानिकाने दोघांच्या मध्यस्तीमध्ये वाद सोडवण्याच्या नादात विवेकने यानिकावर रागाच्या भरामध्ये हात उचलला. यावेळी त्याने खोलीला कुलूप लावले असून यानिकाला कोंडून ठेवलं, मोबईल फोडला, केस ओढले, बेदम मारहाणीच्या प्रकारातून कानाचा पडदा फटाला, डोक्यावर एक जखम असून अंगावर इतर जखमा असल्याचं यानिकाचा भाऊ वैभवने विवेकवर एफआय़आर नोंदवली असून त्यात नमूद केलं आहे.