24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeक्रिकेटअर्जुन पुरस्काराचा मानकरी मोहम्मद शमी

अर्जुन पुरस्काराचा मानकरी मोहम्मद शमी

देशात काही दिवसाआधी देशातील खेळाडूंना शासनातर्फे पुरस्कार देण्यात आले होते. यामध्ये क्रिकेटसह इतरही खेळ खेळले जात आहेत. त्या खेळाडूंना राज्यशासनाने पुरस्कार प्रदान केले आहेत. हे पुरस्कार दरवर्षी होत असतात. भारतातील सर्वात मोठा खेलरत्न हा पुरस्कार आहे. यासाठी दोन बॅटमिंटनपटूंची निवड करण्यात आली आहे. रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना हा मोठा पुरस्कार मिळाला आहे. तर टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अर्जुन पुरस्कारासाठी २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आणि त्यामधून टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

भारतातील रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी यावर्षी बॅडमिंटनच्या क्षेत्रात भारताचे नाव शिखरावर नेऊन ठेवलं आहे. या जोडीने आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. दरम्यान, काही दिवसांआधी वनडे विश्वचषक झाला. या विश्वचषकामध्ये मोहम्मद शमीला काही सामन्यात संधी दिली नव्हती मात्र हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर शमीला संधी देण्यात आली. शमीने त्या संधीचे सोनं केलं आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून शमीने आपले नाव वनडे विश्वचषकामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिलं आहे.

हे ही वाचा

शिवसेना ठाकरे गट लढवणार एवढ्या जागा; संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

थर्टी फर्स्ट आणि नाताळ होणार दणक्यात साजरा; पहाटे पाच वाजेपर्यंत बार असणार सुरु

भारत-पाकिस्तान टी 20 वर्ल्डकपचा सामना होणार ‘या’ दिवशी; तारीख आली समोर

दोन मोठ्या पुरस्कारासाठी बॉक्सिंग, कुस्ती, अंध क्रिकेट या १९ विविध खेळांमधून एकूण २८ खेळाडूंना अंतिम रूप देण्यात आले आहे.

खेलरत्न पुरस्कार

रॅंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार

अर्जुन पुरस्कार ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (नेमबाजी), ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), अंतिम (कुस्ती), रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), अजय कुमार (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग),मोहम्मद हुसामुद्दीन बॉक्सर), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल (अश्वशक्ति) ) ), दिव्याकृती सिंग (अश्वशक्ति ड्रेसेज), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स) या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी