29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal यांचा रेशन घोटाळा, अन्नधान्य ठेकेदारांना सोबत घेवून करोडोची मांडवली !

Chhagan Bhujbal यांचा रेशन घोटाळा, अन्नधान्य ठेकेदारांना सोबत घेवून करोडोची मांडवली !

छगन भुजबळ हे यापूर्वी साधारण अडीच वर्ष तुरूंगात राहून आलेले आहेत(Due to the grace of Bhujbal, there has been a new scandal). तुरुंगात राहिल्यानंतरही ते बाहेर आले. शरद पवार यांच्या कृपेमुळे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. आता एकनाथ शिंदे सरकारमध्येही त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्रीपद आलेले आहे.

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

या खात्यात भुजबळ यांच्या कृपेमुळे नव्याने घोटाळा झाला आहे. धान्य पुरवठा करण्यामध्ये त्यांनी ५९ पैशावरून १.१० पैसे असा दर वाढवून दिला आहे. तब्बल १०० टक्के दरवाढ करून भुजबळ यांनी सरकारी तिजोरी ठेकेदारासाठी खुली करून दिली आहे. पूर्वी अन्न धान्य पुरवठा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार होता. हे अधिकार भुजबळ यांनी आपल्या अखत्यारित आणून ठेकेदारांना वाहतूक अनुदान वाढवून दिले आहे. दुसऱ्या बाजूला आकाश सहकारी संस्थेला भुजबळ यांच्या खात्याने टेंडर दिले आहे. या संस्थेने घोटाळ्यावर घोटाळे केले आहेत. पहिला घोटाळा त्यांनी मुंबई महापालिकेत केला आहे. जवळपास अडिच हजार मेट्रिक टन तांदूळ या संस्थेने शाळांना पोचवलेच नाहीत.

देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याचा विचारही करु नये; छगन भुजबळ

तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. दुसरा घोटाळा म्हणजे, या संस्थेने सरकारी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून ठाणे जिल्ह्यातील धान्य वितरीत करण्याचे परवाने मिळविले आहेत. अशा या घोटाळेबाज संस्थेवर सरकारने कारवाईचा निर्णय घेतलेला आहे. कारवाईची फाईल छगन भुजबळ यांच्याकडे आहे. तरीही कारवाई होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी