टीम लय भारी
मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागरचे (Divya Bhatnagar) सोमवारी मुंबईत निधन झाले. त्या 34 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून तिला कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 26 नोव्हेंबरला दिव्या हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची तब्येत खराब झाल्यावर तिला दुस-या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
तिला न्यूमोनिया झाल्याची बातमी आहे. दिव्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तिची ऑक्सिजन पातळी कमी होत होती, ज्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान ब-याच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर झुंज देणा-या दिव्या हिने आज जगाचा कायमचा निरोप घेतला.
https://www.instagram.com/p/CIeXhFuB85a/?utm_source=ig_web_button_share_sheet
दिव्याची मैत्रिण आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यने इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहून दु:ख व्यक्त केले आहे. तिने लिहिलेय, ‘जेव्हा कोणी कुणाबरोबर नसायचे तेव्हा तू त्याच्यासोबत असायचीस. दिव्या, तू माझी होतीस जिला मी ओरडू शकते होते, रागवू शकते होते, मनातल्या गोष्टी सांगू शकत होते. मला माहिती आहे की तू आयुष्यात खूप काही सोसलं आहेस. तू प्रचंड दु:खात होतीस. पण आता मला माहिती आहे की तू एका चांगल्या ठिकाणी आहेस. जिथं दु:ख, छोटेपणा असं काही नाही. मी तुला मिस करेन दिवु. तुला हे देखील माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला तुझी चिंता होती. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. तू जिथे अशील तिथे आनंदी रहा. तू खूप लवकर निघून गेलीस.’