32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीय“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय”

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय”

अभय गोवेकर, टीम लय भारीचे अधिकृत क्रिकेट तज्ञ 

भारत-न्युझीलंड मालिकेतील पहिली कसोटी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरु आहे. यास आंतरराष्ट्रीय स्टेडीयमचा दर्जा दिला गेलेला आहे. १९४० च्या आसपास श्रीमती ग्रीन स्वत: घोड्यावर बसून फेरफटका मारायची. म्हणून इंग्रजांनी ठेवलेले हे ग्रीन पार्कचे नाव आजही कायम आहे(India New Zealand Kanpur Test Cricket Chapter).

केवळ भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक राहूल द्रवीडच्या आशिर्वादाने या एकाच कसोटीसाठी मधल्या फळीचा फलंदाज सोबत संघाच्या कप्तानपदाची जबाबदारी देवून या राजस्थान रॅयल्स कडून खेळणाऱ्या या आयपीएल खेळाडूस भारतीय संघात पुनरागमन करण्याची एक संधी उपलब्ध करुन दिली.

क्रिकेट : छोडो कलकी बातें कलकी बात पुरानी ! (अभय गोवेकर)

टी 20 वर्ल्डकप 2021 : हार्दिक पंड्याची क्रिकेट प्रेमींसाठी भावनिक पोस्ट

‘अजिंक्य’ हे केवळ नावापुरतेच उच्चार करण्यासाठीचे नाव राहिलेले आहे, कर्तृत्वाने नाही. दैवाने साथ दिली. नाणेफेक जिकण्यास यश आले. संघातील सर्वच खेळाडू ताजेतवाणे अगदी शारीरिक, मानसिक तंदुरुस्त सोबत बोनस म्हणजे खेळपट्टीचा वापर करण्याची प्रथम संधी आपल्याच भारतीय प्रेक्षकांसमोर सामना असल्याने त्यांचाही संपूर्ण पाठिंबा असेच समर्थनही.

संघाचा नवीन प्रशिक्षकाने ताबा घेतला की तो नवीन संघबांधणीची आखणी करतो. यात त्याच्या मर्जीतले त्याच्या होकारात मान डोलवून हो म्हणून सहभाग-सहकार्यात साथ-संगत करणाऱ्यांना प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. जो प्रशिक्षकासोबतचा कालबध्द करार केला गेलेला असतो तोपर्यंत त्याचेच भारतीय क्रिकेट साम्राज्य चालू असते-राहते, ही सध्याची प्रथा आहे.

याचा आरंभ तत्कालीन कर्णधार व आत्ताचा मंडळाचा अध्यक्ष गांगुली याने केला. केवळ उदाहरणार्थसाठी त्यांच्या खाजगी कारखान्यातून झहीर खान, हरभजनसिंग, नेहरा, आर पी सिंग, युवराज सिंग, सेहवाग, महंमद कैफ असे अनेक खेळाडू निघाले व त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व केले. जॉन हाईट सोबत गांगुलीने जुळवून घेतले. परंतु गांगुलीनेच ग्रेग चॅपलला आणून गुलाबजाम-रसगुल्ला देवून तृप्त केले. परंतु ग्रेगने गांगुलीसकट सर्वांचे विसर्जन केले.

शाहीद आफ्रिदीने जावयाला सुनावले खडेबोल, पाकिस्तानचा पराभव शाहीन आफ्रिदीमुळेच

Ranveer brings alive greatest story of India’s win with ’83’ trailer

ग्रेग चॅपेलने केलेल्या स्वत:च्या कर्मामुळे तोंड लपवून देश सोडून जावे लागले. प्रशिक्षकाचे नाव, कार्य, योगदान, यश या सर्वांस त्याने कलंकीत केले. यानंतर त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा गॅरी करर्स्टन आला. याने धोनीशी जुळवून घेऊन कार्यभाग साधला. सुवर्णकाळाची नोंद केली.

धोनी कर्णधार झाल्यावर त्याने गांगुलीच्या समर्थकांना संघाबाहेरचा रस्ता दाखविला. रैना, रविंद्र जडेजा, अश्विन, गंभीर, कोहली, युसुफ पठाण यांचा उदय झाला. विशेषत: चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडुंचे दरवाजे उघडले गेले. भारतीय संघातून प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त झाली. याच काळात मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन हे याच संघाचे मालक होते. तर कर्णधार धोनी दोघांच्याही संगनमताने मुंबईच्या एका खेकड्यास इतरांना दंश करण्यास आमंत्रित केले गेले, जो पत्रकारांनाही शांत करु शकेल. मद्रासमध्येच डावपेच आखून निवड समिती सदस्य, अध्यक्ष यांच्या मानधनाची पूरेपूर व्यवस्था करुन घेवून सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, द्रवीड व इतरांची कळत नकळत अवस्थेत गच्छंती करण्यात आली. या अनुभवी खेळाडुंची जागा भरुन काढण्यासाठी योग्य पात्रतेचे खेळाडू मात्र त्यावेळेत त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. वेस्ट इंडीज सोबत दोन जबरदस्तीचे कसोटी सामन्यांचे आयोजन करुन सचिन तेंडुलकरलाही निवृत्ती घेण्यास भाग पाडले.

असे आहे भारतीय क्रिकेटमधील अंतर्गत राजकारण तर असामान्यांसाठी बुध्दीबळ.  आता धोनीच्या निवृत्तीचा खेळ आपण अनुभवीत आहोतच. ‘आत्ता तुझी पाळी… मीच देतो टाळी’ असा रंगतदार खेळ मात्र सुरु आहे.

त्यानंतर कोहली, शास्त्रीचा काळही आपण पाहिला व अनुभवलाही. या काळात आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्सच्या खेळाडूंना संधी मिळाली. चहल, बुमरा, हर्षल पटेल, केदार जाधव, राहूल यापैकी काहींची निवड झाली. काही स्थिरावले तर कोणी बाहेर गेले.

टी २० विश्वचषक स्पर्धेत ‘रस्त्यात खड्डे खड्याच रस्ता’ याचे संशोधन झाले. आता पाळी द्रवीडची. यापूर्वी १९ वर्षाखालील खेळाडूंचा तोच प्रशिक्षक असल्याने बऱ्याच खेळाडूंचा त्याच्याशी परिचय आहे. आज भारतीय ‘अ’ संघ समावेत याच खेळाडूंची निवड केली जाते. आता चालू असलेल्या न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात गिलने अर्धशतक झळकावून आघाडी साठीचा स्वत:चा क्रमांक नक्की करण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र जडेजाने आपल्या १७ व्या अर्धशतकाने अष्टपैलुत्व सिध्द केले आहे. अश्विनने ३८ धावांचा आपला वाटा देवू केलेला आहे.

मधल्या फळीतील फलंदाजांची खरे पाहता भरघोस धावा करण्याची आवश्यकता होती. दोन्ही उपकर्णधारांनी अपेक्षाभंगच केला. ३०-४० धावा म्हणजे केलेली उपेक्षाच आहे. या दोघांनाही धावा करण्याची फार मोठी संधी उपलब्ध होती. शक्यही होते. जे श्रेयस अय्यरने आपल्या शतकी खेळीने दाखवून दिले. संघातील आपल्या स्थानाचा हक्क त्याने बजावलेला आहे. आता चंगु-मंगु-सोम्या-गोम्याची निवड समिती रहाणे अद्याप शहाणे न झाल्याने किंवा मंडळाच्या सचिवाचा गावचा पुजारा यापैकी एकास विश्रांतीचा सल्ला देते हे मुंबई कसोटी सामन्याची संघ निवड होईल तेव्हा पाहण्याजोगे असेल. देशप्रेम, वशिलेबाजी, अन्याय यांचा प्रत्यक्षात प्रत्यय येईल.

आपल्या कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच शतक ठोकणारा अय्यर हा १६ वा खेळाडू ठरला. यापूर्वी मुंबईच्याच २०१३ साली वेस्टइंडीज समोर रोहीत शर्माने व २०१८ मध्ये पृथ्वी-शॉ ने शतकी मान मिळविला होता.

१९५५ साली कृपाल सिंग १९७६ साली सुरींदर अमरनाथ व त्यानंतर अय्यर या तीघांनी न्युझीलंड समोरील पदार्पणात शंभरी गाठलेली आहे.

कानपूरला यापुर्वी ऑस्ट्रेलीया विरुध्द गुंडप्पा विश्वनाथने १३७ धावा १९६९ साली केल्या होत्या. लाला अमरनाथ १९३३, दिपक शोधन १९५२, अब्बास अली बाग १९५९, हनुमंत सिंग १९६४, अझरुध्दीन १९८४, गांगुली १९९६, सहवाग २००१, रैना २०१०, शिखर धवन २०१३, रोहीत शर्मा २०१८, पृथ्वी शॉ व २०२१ अय्यर या सर्वांनी सुध्दा आपल्या पदार्पणातच शंभरी गाठली आहे.

भारताची धावसंख्या २ बाद २६६ अशी होती. नंतर कसोटी संघातील आठ खेळाडू केवळ ७९ धावांची भर टाकून १११ षटकात सर्व बाद ३४५ धावसंखेवर भारताचा डाव आटोपला. कानपूर विक्रमवीर सौदीने ७० धावांत ५ बळी घेतले. जेमीसनने ९१ धावांत ३ बळी मिळवीले. तर पटेलने ९० धावा देऊन २ बळी घेतले.

न्यूझीलंडने आपण पहिला डाव सुरु केला विल यंग नाबाद ७५ तर टॅम लॅथम ५० धावांवर खेळत आहे. आघाडीविरांनी बिनबाद १२९ धावसंख्या उभारली आहे. राहाणेने ५ गोलंदाज वापरुन पाहिले पण फलंदाजास बाद करणे कुणास शक्य झालेले नाही. डिसेंबर २०१६ नंतरची यंग व लॅथम यांनी भारतात केलेली ही पहिलीच भागीदारी आहे. यापूर्वी इंग्लंडच्या कुक व पेनीग्जने १०३ धावांची भागीदारी मद्रास कसोटीत केली होती. २०१६-१७ चे ते वर्ष होते.

आजच्या दिवसाचा पहिला मानकरी अर्थात अय्यर ज्याने शतक झळकावले खरे परंतु मनात नक्कीच विचारांचे वारे वाहात असणार की त्याला पुढच्या कसोटीत कदाचित आपली जागा कोहलीस परत द्यावी लागणार माहीत असूनही असा बहारदार खेळ करणे वाटेल तेवढे सोपे कधीच नाही. टी २० एकदिवसीय ५० शटकांचे मर्यादित सामने व आज कसोटी तीनही प्रकारात साजेशी सामगीरी आहे. केवळ पांढऱ्या चेंडुचे क्रिकेटच उत्तम खेळतो असे नाही. लाल चेंडूचाही चांगला समाचार घेवू शकतो हे सर्वांनाच दाखवून दिले.

दुसरा मानकरी म्हणजे जडेजा आता हार्दिक पांड्या संघात असो-नसो ‘हम भी कुछ कम नही’ याचे प्रात्यक्षिक आज जडेजाने पेश केले. तुम्ही त्याच्यावर नक्कीच अवलंबून राहू शकता याची खात्री पटवून दिली. सोबत अश्विनही आहेच. संघ नक्कीच समतोल होऊ शकतो. ज्याने सहा वेळा ५ बळी व ३ वेळा एकंदरीत १० बळी घेण्याची कामगीरी केलेली आहे. त्याच्यासारखीच न्युझीलंड विरुध्द अशा प्रकारची गोलंदाजी करणारा दुसरा इंग्लंडचा डावखूरा फिरकी गोलंदाज डेटेक अंडरवुड होता.

न्युझीलंड संघाचा माजी कर्णधार रॉस टेलर हा भारतात भरपूर आयपीएल चे क्रिकेट खेळला असल्याने हवामान, खेळपट्ट्या, शहरे यांची माहिती त्यास आहे. भारतास भारतात हरविणे सोपे नाही तसेच ऑस्ट्रेलियाचेही आहे. या दौऱ्यावर निघण्यापूर्वीच तुमची खेळाडू म्हणून शारीरिक  तसेच मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही चमक दाखवू शकता. अन्यथा अपयशाचे मानकरी. कानपूर कसोटीचा कर्णधार टीम सौदी म्हणतो त्याला आपल्या गोलंदाजीवर भारताचे पांच खेळाडू बाद करण्यात यथ मिळावे. त्याच्यामते खेळाचे शीण जाण्यासाठी हेच ‘पेन किलर’ ठरेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी