29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्रिकेट“पावसकर विरुध्द मुंबई कसोटी सामना”

“पावसकर विरुध्द मुंबई कसोटी सामना”

अभय गोवेकर, टीम लय भारीचे अधिकृत क्रिकेट तज्ञ

हम काले है तो क्या हुआ दिलवाले है /

हम तेरे तेरे तेरे चाहने वाले है //

असे आज बॉंम्बे क्रिकेट असोसिएशनचे आर्थिक प्रशासन नक्कीच म्हणत असेल. इंग्रजी कॅलेंडरमधील २०२१ वर्षातील शेवटचा १२ वा महिना अर्थात डिसेंबर यातील पहिला आठवडा ज्यात पावसाळ्याप्रमाणे कोसळणारा, दिवसभरात विश्रांती न घेणारा,  सुर्यदर्शनास मज्जाव करणारा, मानवी जीवन काही काळासाठी विस्कळीत करणाऱ्या ‘पावसकराने’ आपल्या नैसर्गिक रागरोषाची झलक पेश केली. सर्वांचेच बारा वाजविले. पंचांग शास्त्रानुसार आता कार्तिक महिना संपून मार्गशीर्षास आरंभ होईल. शीर्ष म्हणजे ‘मस्तक’ जे स्थिर राहून महिन्यासाठीचा मार्ग मोकळा होईल असा हा महिना. निसर्गाने येथेही जोरकस प्रहार करुन जणू काही दणकाच दिलेला आहे. मानव पंचमहाभूतांशी–निसर्गाची जी थट्टा-मस्करी करतो, ते निसर्गास अजिबात मंजूर नाही, याची परिणीती म्हणजे हा अवेळी पडणारा पाऊस असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही(Abhay Govekar.. Rain vs Mumbai test cricket, Ind vs Nz).

मुंबई (बॉम्बे) हे गोड नाव असताना खरीखुरी क्रिकेटची पंढरी होती. आज नाही. मुंबईच्या खेळाडूस प्रथम बाहेरचा रस्ता दाखविला जातो. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही खेळाडू आजच्या राष्ट्रीय-भारतीय संघात दिसणार नाहीत. एक काळ असा होता की, या बेटावरील किमान सात-आठ खेळाडू देशाचे प्रतिनिधीत्व अभिमानाने करताना आढळत होते. नामकरणाने क्रिकेटची प्रगती होत नाही. आज आपल्या क्रिकेटचा अंत करावयाचा असल्यास तर जरुर येथे यावे.  येथे खेळ-खेळाडू जिवंत आहे. योग्य मार्गदर्शन, सुख-सोईसुविधा यांचे काय ? आसने उपलब्ध आहेत. ग्रहण करणारे-स्थानापन्न होणारे यांच्या योग्यतेबद्दल खात्रीचे, हमी देणारे-घेणारे त्यांना बसविणारे भाष्य करतील का ?

क्रिकेट : छोडो कलकी बातें कलकी बात पुरानी ! (अभय गोवेकर)

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय”

खेळाडूंपेक्षा प्रशिक्षकच जास्त आहेत. प्रत्येक मैदानात त्यांच्या दुकानास भेट देऊन आवश्यक तो बोध घेणे पालकांसाठी जरुरीचे आहे. एका रात्रीत मुलास महान खेळाडू बनविण्याची शाब्दिक ग्वाही ते आत्मविश्वासाने  देताना आढळतात. ग्रॅंटरोड येथे तर बाजार भरतो, लिलावही होतो असे ऐकीवात आहे. पूर्वीच्या काळी आमच्यासारखे अति प्रगत आर्थिक गणिते गुंफलेले क्रिकेट नव्हते.

आजच्या क्रिकेटमध्ये शास्त्रज्ञही आहेत. त्यांनी लावलेल्या शोधानुसार दक्षिण मुंबईत क्रिकेट संपल्यातच जमा आहे. खरे पाहता जास्तीत जास्त शाळा-महाविद्यालये-मैदाने स्पर्धा आयोजन याच विभागात होते. संबंधित कार्यालये याच कक्षेत येतात. परंतु तुलनेत मुंबई उपनगरात जास्त क्रिकेट खेळले जावे म्हणून बी.के.सी., कांदिवली येथे सचिवांच्या आर्थिक सोईसाठी सोबत क्रिकेटचा वापर करुन क्लब हाऊस तसेच मैदानांची व्यवस्था केली गेली. इन-डोअर क्रिकेट आले. परंतु प्रगत क्रिकेट नजरेस पडत नाही.

पूर्वीच्या क्रिकेट प्रशासनात हिरे माणके होती. शनि-मंगळ-राहू-केतूची छाया नव्हती. कै.श्री.वानखेडे-घरत, एस.व्ही.कदम, प्रा.चंदगडकर, बाळ म्हाडदळकर व त्यांची टीम प्रभूदेसाई त्यानंतरचे व आत्ताचेही रवी सावंत, मांद्रेकर, डॉ.शेट्टी, नितीन दलाल, दीपक मुरकर, अरमान मलिक, श्रीकांत तिगडी, अवि सुळे, इक्बाल शेख, मिलिंद रेगे, हेमू दळवी, प्रा. राम असे अनेक नि:स्वार्थी क्रिकेट प्रेमी स्वत: खेळाडू, प्रशासक म्हणून क्रिकेटची सेवा करीत होते. तो क्रिकेटचा सुवर्णकाळ होता. इथपर्यंत क्रिकेट सुसंस्कृत, सुशिक्षित, सद्गृहस्थांचा आहे, अशी खात्री तत्कालीन लोकांना खात्रीपूर्वक होती. या प्रशासनास पुढील काळात नजर लागली. हा खेळ यापुढे विकसित, विलासी झाला पाहिजे म्हणून ‘ कडू-कोल्हे ‘ यांनी बाणकोटी नाच करुन ‘आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं’…. असे गाणे गात ज्यांचा कोणत्याही खेळाशी संबंध येऊ नये त्यांनाच सत्तेत बसवून केवळ उद्घाटनाच्या फिता-रिबीनी कापण्याचे कार्य सोपविले. हे ‘घोटाळेपर्व’ होते. प्रबंध-लिखाण होऊन संशोधनाबद्दल डॉक्टरेटही मिळू शकेल. पीएचडी नावापुढे नक्कीच लागू शकेल. पुढील लिखाणात याचा संबंध-संदर्भ नक्कीच येणार आहे. कडू-कोल्हेंना स्वार्थ साध्य करता आला. त्यासाठी क्रिकेटचे बलिदान दिले गेले. सहकाऱ्यांच्या मानसन्मानांची नाचक्की झाली. क्रिकेट मात्र मागासलेल्या अवस्थेत नेले गेले. पहिला आठ वर्षाचा वनवास क्रिकेटने भोगला. आजही आपण या अवस्थेतून संपूर्ण बाहेर आलेलो नाही. यांच्या कर्माची फळे आज आपण सर्वांच्या स्वच्छ सुर्यप्रकाशात नजरेस पडत आहेत.

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय” (भाग २)

India vs New Zealand Live Cricket Score, 2nd Test, Day 1: Mayank, Gill give India steady start

उद्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर न्युझीलंड विरुध्द भारत यांच्या मधील दुसरा व अंतिम कसोटी सामना रंगणार आहे. पावसाच्या अवकृपेमुळे कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे योग्य ठरणार नाही. ‘वेळ’च आपले योग्य कार्य करेल. ५ वर्षांनंतर आज असोशिएशनला सामना आयोजन करण्याची संधी मिळत आहे. खरे पाहता प्रेक्षकांविना हा सामना खेळविण्यास हवा होता. परंतु औदार्य आपण दाखवू शकतो का ? आर्थिक कमाईचा मोह टाळू शकतो का ? अर्थातच नाही. कारण रोज नित्यनियमित १०० करोडच्या बातम्या ऐकण्याची सवय आमच्या कानांना झालेली आहे. स्टेडियमची आसन संख्या ३३,००० ची आहे. असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाशी आवश्यक तो पत्रव्यवहार केलेला आहे. १०० टक्के उपस्थितीसाठीची पूर्ण परवानगी मागण्यात आलेली आहे. परंतु शासनाकडून लिखीत-अज्ञात स्वरुपात काहीही उपलब्ध झालेले नाही. असे सांगितले जाते. २५ टक्के मिळाल्यास ८५०० लोकांची उपस्थिती दर्शवू शकतील. वानखेडे स्टेडीयमसाठीची नियमावली वेगळ्या स्वरुपाची असल्याने त्याचा संदर्भ घेतला गेलेला नाही. अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार झालेला नाही असे जाणवते.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नव्या प्रकारच्या कोरोना ‘ओमिक्रॉन’ मुळे गर्दी टाळणे असा इशारा दिला गेलेला आहे. भीती कमी झालेली नाही. मास्क बंधन जरुरीचे आहे. त्यात पावसाचेही संकट आहे. सोशल डिस्टन्स पाळावयाची गरज आहे.

१२०० संख्येच्या तिकीट विक्रीस मान्यता आहे. ऑनलाईन ११९३, गरवारे क्लब हाऊस सवलतीत तिकीटे करारानुसार ६०००/१५००, पांच जिमखाना ४२०० मधून १२०० असोसिएशन सोबतचे संलग्न क्लब, १९/५ तिकीटे संख्या ६२५१ मधून १६४५ मोफतलाल कंपनी सन्मानिका, ५००० बीसीसीआय कोटा, ९८१ माजी खेळाडू-पुरस्कर्ते-स्टेडिअम उभारणी, आश्रयदाते-प्रशासन अधिकारी बोर्ड-रणजी पंच १३७० अशी विभागणी होवू शकते.

रवी सावंत, डॉ. पी. व्ही. शेट्टी, पंकज ठाकूर, अशोक प्रधान, अभय हडप अशी सल्लागार कमिटीची नियुक्ती केली गेलेली आहे. यापुढे शाळा आणि महाविद्यालयाचे सर्व क्लब यांना भारतीय नियामक मंडळाकडून अनुदान देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शनही यापुढे दिली जाणार आहे. ज्यात अधिकारी वर्गही असू शकेल. याचे वाटप मात्र असोसिएशन करेल. अमोल मुजुमदार आज मुंबईचा प्रशिक्षक आहे. त्याने असोसिएशनच्या अध्यक्षांना किंवा कार्यालयास विश्वासात न घेता लेखी न कळविता थेट राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज केला. हे असोसिएशनला रुचलेले नाही. संदर्भात केवळ नाराजी व्यक्त केली. विषयांची चौकशी कार्यवाही अद्याप बाकी आहे. मुंबईची ही खरी ओळख आहे. मुंबईच्या कोणत्याही क्रिकेटचा संबंध गंध असलेल्या व्यक्तीस मी इतरांपेक्षा जास्त हुशार, शहाणा किंवा विद्वान आहे असे वाटले कारण सभोवतालचे आजचे वातावरण दुषित आहे. उद्या मुंबईच्या खेळाडूंनी असे वर्तन केल्यास यास जबाबदार कोण ? यांचा आदर्श ठेवावा का ? यांचे मुंबई संघातून खेळणे बंद झाल्यावर या खेळाडूने जेथे क्रिकेट जास्तसे परिचीत नाही. त्या विभागात जाऊन संधी निर्मिती करुन रणजी स्पर्धेत विक्रम केला. द्रोणाचार्यांच्या तालमीतील कौरवांना सर्व माफ आहे. असा अनेकांचा समज होऊ शकतो. पात्रता असूनही आपली स्वप्ने अपूरी राहतात. म्हणून कृतीपूर्वी विचार करण्याची सवय लावावी.

भारत विरुध्द न्युझीलंड यातील मुंबईत होणारा दुसरा कसोटी सामना पावसामुळे वेळेत सुरु होण्याची शाश्वती आजतरी देता येणार नाही. हवामान खाते आपला अंदाज व्यक्त करते, परंतु त्याचीही खात्री देता येत नाही. किंबहुना अवलंबून राहणे धोक्याचे ठरेल. पाऊस जरी थांबला तरी कडकडीत उन्हाची गरज आहे. या मैदानात पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो अशी सोय करुन ठेवली गेलेली आहे. खाली वाळू घातलेली आहे. ड्रेनेज व्यवस्था अतिउत्तम प्रकारची आहे. ऊन पडले तरच सर्व सुख सोईस्कर होऊ शकेल. मैदान कर्मचारी याचे समर्थन करतात.

दोघाही संघाना अद्याप सराव करणे शक्य झालेले नाही. वाढलेले गवतही अद्याप पूर्णपणे कापले गेलेले नाही. हे कामही बाकी अवस्थेतच आहे. मैदानाचा भाग ओला झाल्याने मऊ झाला आहे. खेळपट्टी आच्छादित आहे. यावरही पाणी साचलेले असते. ते काढणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. पाऊस थांबल्यावर एका तासाने खेळपट्टीवरील आच्छादने काढली जातील. पाणी खेळपट्टीवर जाणार नाही, याची दक्षता घेऊन बाजूस काढले जाईल. सुपर सॉपरच्या मदतीने मैदानाचा तो भाग कोरडा करावा लागतो.

खेळपट्टी जरी आच्छादित असली तरी रोज १ मिली मीटर त्याची वाढ होतेच. पाणी राहणार नाही. साचणार नाही याची विशेष काळजी त्यांना घ्यावी लागणार.

जशी कानपूरची खेळपट्टी होती त्याच प्रकारची ही खेळपट्टी असेल. मैदानात पावसामुळे पाणी मारण्याची आवश्यकता भासलेली नाही. वानखेडेच्या खेळपट्टीने आपला लौकिक राखणे महत्वाचे.

संघ निवड करताना इशांत शर्मा, पुजारा, रहाणे यांच्याबद्दल काय निर्णय होतो हे पाहण्याजोगे असेल. दुर्दैवाने साहा खेळू न शकल्यास आंध्रचा यष्टीरक्षक त्याची जागा घेऊन गिल सोबत आघाडीस येईल. वानखेडेची खेळपट्टी तयार करणाऱ्यांनी तसेच मैदानाची देखभाल करणाऱ्यांनी खेळपट्टी सोडून लगतच्या मैदानात वाळू टाकल्याचे सांगितले. या वाळूची व्यवस्था त्यांच्यासाठी कोणी व कशी केली ? कायद्यात हे मान्य नाही. हा गुन्हा ठरु शकतो. मग यांच्यासाठी काही विशेष बाबींतर्गत नियमात शिथिलता देऊन पळवाटेसह कायद्यात तरतूद करुन केवळ मैदानासाठीची वाळू म्हणून मंजुरी आहे का ? इतरत्र वाळू माफिया संबोधून संबंधितांवर त्वरीत कार्यवाही केली जाते. नसल्यास हा दुजाभाव समजावा का ?

वाळूच्या गुणधर्माप्रमाणे पाणी शोषले जाणार, पाणी असताना मुलायम-मऊ असणार पण एकदा का ऊन लागले की त्वरित सुकणार तेव्हा मात्र टणक होऊन भेगा पडून घट्ट होत जाणार. गल्लेभरु सामना आयोजकांना सामन्यातील खेळातील वेळ फुकट जाऊ नये म्हणून केलेली ही तजवीज असते. बरे-वाईटाची चिंता विचार करण्यास वेळ नसतो. खालील मुद्दा मुद्दामहून उदाहरणादाखल घेण्यात आलेला आहे.

सामना चालू असताना क्षेत्ररक्षक आपापल्या कर्णधाराने नेमून दिलेल्या जागेवर उभे राहून क्षेत्ररक्षण करीत असतात. खेळपट्टीच्या बाहेरील क्षेत्रास ‘आऊट फिल्ड’ असे म्हणतात. ज्यावर क्षेत्ररक्षण करीत असताना क्षेत्ररक्षक आपल्या पायाच्या बुटांना स्पाईक्स (खिळे) प्रकार असलेले बुट वापरतात. याने धावत करीत असताना हे खिळे-स्पाईक्स वाळूत रुततात. हालचालीवर नियंत्रण आणले जाते. पाय, गुडघे, मांड्या यांच्या स्नायुंवर ताण पडतो व दुखापती होतात. जास्तीत जास्त खेळाडू आजवर या मैदानातील वाळूमुळे दुखापतग्रस्त झालेले आहेत. त्यातून सावरण्यासही बराच कालावधी लागतो. गल्लाभरु सामने आयोजित करणाऱ्यांना खेळाडूंच्या दुखापती विषयी देणे घेणे नसल्याने त्यांना काहीच फरक पडत नाही. कोणत्याही स्तरावरील खेळाडू असो त्याचा त्याला वाली कोणीही नसतो. हे सत्य असले तरी बोलले किंवा चर्चिले जात नाही. खेळाडूंचे मात्र अमाप नुकसान होते. हे दुर्दैव ते खेळ व खेळाडूंचे…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी