25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
Homeटॉप न्यूजअफगाणिस्तानचे दोन्ही खेळाडू खेळणार आयपीएल

अफगाणिस्तानचे दोन्ही खेळाडू खेळणार आयपीएल

टीम लय भारी

मुंबई : तालिबानने गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानवर कब्जा मिळवत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दुबईला होणाऱ्या आयपीएलमध्ये अफगाणिस्तानचे दोन खेळाडू खेळणार की नाही असा प्रश्न होता. परंतु यावर हैदराबादच्या व्यवस्थापनेने दोन्ही खेळाडू खेळणार असल्याचे सांगितले आहे ( Afghanistan’s two players will be playing in IPL).

इंडियन प्रीमियर लीग 19 सप्टेंबर पासून दुबईला खेळवण्यात येणार आहे. यामध्ये सनराइजर्स हैदराबाद या संघातील लेग स्पिनर राशिद खान आणि अष्टपैलू मोहम्मद नबी हे दोघेही दुबईला होणाऱ्या उर्वरित आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत असे हैदराबादच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

मनसेचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, पण टास्क फोर्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून

भारताच्या कवयित्री सुभद्रा चौहान यांना गुगलने डूडल बनवत दिली श्रद्धांजली

Rashid Khan and Mohammad Nabi to play in IPL
राशिद खान आणि मोहम्मद नबी खेळणार आयपीएल

कोरोना महामारीमुळे या वर्षी पुढे ढकलण्यात आलेला 14 वा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 19 सप्टेंबर पासून दुबईला होणार आहे. त्यानंतर अबूधाबीला कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना खेळला जाईल. दुबईत 13 सामने, शारजाहमध्ये 10 आणि अबूधाबीमध्ये 8 क्रिकेटचे सामने होणार आहेत.

राष्ट्रवादीच्या मंत्र्याला नवसाने मिळाले दालन, पण अधिकाऱ्यांची अवस्था लिपीकासारखी

Rashid Khan and Mohammed Nabi’s IPL participation in focus as Taliban takes over Afghanistan

राशिदने अफगाणी लोकांना वाचवण्यासाठी जगातील बड्या नेत्यांना केले होते आवाहन 

काही दिवसांपूर्वी राशिदने अफगाणिस्तानात तालिबानने केलेल्या क्रूरतेबद्दल भाष्य केले होते. त्याने ट्विटरच्या माध्यमातून जगातील बड्या नेत्यांकडे अफगाणी लोकांना वाचवण्याचे आवाहन केले होते. सध्या राशिद युनायटेड किंगडममध्ये असून तो ट्रेंट रॉकेटसकडून खेळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी