31 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रअमित देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

अमित देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

टीम लय भारी

लातूर : बंगाल प्रांतात सुरूवात झालेले गुलाब वादळ अरबी समुद्रात गेल्याने त्याचे शाहीन चक्रीवादळात रुपांतर झाले. तसेच काही कालावधीनंतर हे चक्रीवादळ लोप पावलं आहे. परंतु त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसले आहेत. (Amit Deshmukh inspected the damage caused by heavy rains)

अनेक भागांत पिकांचे तसेच शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव व वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या बाबत नुकसानीची पाहणी केली आहे.

चित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

आदित्य ठाकरेंचे कार्बन संतुलित शहरांसाठी प्रयत्न

निलंगा तालुक्यातील गौर गौरी येथे जाऊन इतर अधिकाऱ्यांसह आणि काही सहकाऱ्यांसह अमित देशमुख यांनी ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधला आहे. तसेच गावकर्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले आहे.

अपघातग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याच्या परिभाषेत बसणारे हे अभूतपूर्व संकट असल्यामुळे शासन त्या दृष्टीने निश्चितपणे विचार करील अशी ग्वाही दिली.नदीकाठच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या दृष्टीने विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी असे निर्देश याप्रसंगी दिले आहेत.

शेतकरी संकटांचा सामना करण्यासाठी एकटे पडले नसल्याचा दिलासा त्यांच्या या भेटीतून शेतकऱ्यांना मिळाला आहे.

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना धमक्यांसहित फुकट सल्ले

Resident doctors firm on strike from Oct 1 to press for fee .. Read more at: 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी