29 C
Mumbai
Tuesday, September 24, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णांचे चोख प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णांचे चोख प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना (Anna Hazare) खोचक शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अण्णा हजारेकडून (Anna Hazare) विविध प्रश्नांवर आंदोलनाची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ‘तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?’ अशा खोचक शब्दांत अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाडांना चोख प्रत्युत्तर दिले (Anna Hazare responded to Jitendra Awhad).

अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या वाढदिवशी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही शुभेच्छा दिल्या होत्या, पण त्या खोचक शब्दांत दिल्याने त्याची वेगळी चर्चा झाली. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटले होते, ‘प्रिय अण्णा, प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोनामुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता. #HappyBirthdayAnna’

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेले ट्वीट सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरले होते. काही नेटकऱ्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे समर्थन केले तर काहींना अण्णा हजारे यांच्यावतीने उत्तर देण्याचाही प्रयत्न केला होता. स्वत: अण्णा हजारे (Anna Hazare) यांनीही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अशाच खोचक शब्दांत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

धनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय!

संजय राऊतांचा राज्यपाल कोश्यारींना टोमणा; ट्विटवरून केली टीका

Why vaccine hesitancy should not be tackled through a carrot and stick policy

अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी म्हटले आहे की, ‘मी एक सामान्य माणूस आहे. जनतेची सेवा करतो. पण तुम्ही तर मंत्री आहात, या प्रश्नांसाठी मग तुम्ही काय केले? प्रत्येक प्रश्नासाठी अण्णा हजारे (Anna Hazare) यांनीच आंदोलन करावे का? तुम्हीही जनतेचे सेवक आहात, मग तुम्ही जनतेसाठी काम का करीत नाही?’ असा सवाल उपस्थित करून अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे (Anna Hazare has given an apt reply to Jitendra Awhad).

सुरुवातीला अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी उत्तर देण्याचे टाळले होते. नंतर त्यांनी केवळ हे प्रश्न उपस्थित करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या भूमिकेसंबंधी काही घटकांकडून सातत्याने शंका घेण्यात येत असते. राष्ट्रवादीचे नेते यामध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे संधी मिळताच अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्यावर टीका केली जात असल्याचे दिसून येते. वाढदिवसाचे निमित्त साधून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शुभेच्छा देतानाही टीका करण्याची संधी साधली होती. अशा टीकेची दखल घ्यायची नाही, उत्तर द्यायचे नाही, असे अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी ठरविल्याचे दिसून येते. अनेकदा अण्णा हजारे (Anna Hazare) अशा प्रकारांकडे दुर्लक्षच करताना दिसतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी