29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeनिवडणूकफडणवीसांच्या आगमनाच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा

फडणवीसांच्या आगमनाच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा

टीम लय भारी

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्याच आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. पण आता राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचातीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम १० अ पोटकलम (४) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूक जाहीर केल्या आहेत. निवडणूक असलेल्या तालुक्यात ५ जुलैपासून आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ४ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार असून ५ जुलैला मतमोजणी घेण्यात येणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मनाबाद, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. आघाडी सरकार पडून पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर येण्याचे चित्र दिसू लागले. पुन्हा एकदा सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. तशी तयारी देखील भाजपकडून करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपच प्रभावी पक्ष ठरतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे सुद्धा वाचा :

आमदार फुटला, पण त्याचे फेसबुक चालवणारा शिवसैनिक नाही फुटला

कलम 370 हटवूनही ‘अमरनाथ‘ यात्रेवर संकटाची टांगती तलवार

Exclusive : भाजप नेत्याकडून घरचा आहेर, देवेंद्र फडणविसांनी शपथ घेताच शिंदे गटाचे आमदार ईडीच्या कारवाईतून मुक्त होतील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी