38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयकलम 370 हटवूनही ‘अमरनाथ‘ यात्रेवर संकटाची टांगती तलवार

कलम 370 हटवूनही ‘अमरनाथ‘ यात्रेवर संकटाची टांगती तलवार

टीम लय भारी

श्रीनगर : कोरोना महामारीच्या संकटामुळे दोन वर्ष अमरनाथ यात्रा बंद होती. तसेच Amarnath pilgrimage सुमारे 43 दिवस ही यात्रा चालणार आहे. अमरनाथ यात्रेला केंद्रसरकारने सुरक्षा पुरवली आहे.

या यात्रेमध्ये मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. यात्रेमध्ये स्टिक बाॅम्ब तसेच ड्रोन हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पूर्व तयारी झाली असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे. 30 जून ते 11 ऑगस्टपर्यंत ही यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी सुमारे 3 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी नाव नोंदणी केली आहे. हा आकडा 8 लाखांपर्यंत पोहोचू शकतो.

ही यात्रा अत्यंत कठीण समजली जाते. कारण 14 किमी अंतर हे बर्फातून पार करावे लागते. ढगफुटीची देखील शक्यता असते. काश्मीर खोऱ्यातील डोंगर रांगामध्ये सैनिक तैनात करण्यात आले आहेत. कॅमरे आणि ड्रोनच्या माध्यमातून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. घुसखोरी रोखण्यासाठी लखनपुर, बनिहाल भोगदा, बालटाल, पहलगाममध्ये सुरक्षेसाठी लष्कर तळ ठोकून आहे.

हे सुध्दा वाचा :

बापरे ! एकदाच मिळाला ‘286‘ महिन्यांचा पगार

Exclusive : भाजप नेत्याकडून घरचा आहेर, देवेंद्र फडणविसांनी शपथ घेताच शिंदे गटाचे आमदार ईडीच्या कारवाईतून मुक्त होतील

‘ठाकरे सरकार म्हणजे, नळाच्या तोट्या घेऊन जाणारा भाडेकरू’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी