टीम लय भारी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच आता या सत्तांतराविषयी भाजपमधूनच नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. भाजपच्या एका माजी आमदाराने ‘लय भारी’ला Whats app मेसेज पाठवला आहे. या मेसेजमधून त्यांनी फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहेच. पण शिंदे गटाच्या आमदारांच्या बंडखोरीबद्दलही सूचक टिप्पणी केली आहे.
‘एकनाथ शिंदे गटाचे आमदार भाजपला समर्थन करतील असे स्पष्ट झाले आहे. बऱ्याच आमदारांवर ईडीची टांगती तलवार आहे. फडणवीस यांनी शपथ घेताच हे आमदार ईडीच्या संकटातून मुक्त होतील’ अशा आशयाचा मेसेज या माजी आमदारांनी ‘लय भारी’ला पाठविला आहे.
चरण वाघमारे असे या भाजपच्या माजी आमदाराचे नाव आहे. या मेसेजच्या पार्श्वभूमीवर वाघमारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या अनुषंगाने त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन लागला नाही.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह बहुतांश बंडखोर आमदारांवर ईडी, आयकर विभाग अशा केंद्रीय संस्थांची टांगती तलवार आहे. त्यामुळेच या आमदारांनी बंडखोरी केल्याचे बोलले जात होते. आता भाजपच्या नेत्याकडूनच त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
हे सुध्दा वाचा:
‘ठाकरे सरकार म्हणजे, नळाच्या तोट्या घेऊन जाणारा भाडेकरू’
सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, ठाकरे शोलेतील ठाकूर आहेत का ?
जय श्रीराम, टाटा…बाय बाय.. सुधीर मुनगंटीवारांनी ‘महाविकास आघाडी’ला हिणवले