30 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeराजकीयकेंद्र व भाजपने देशाची माफी मागावी, अशोक चव्हाणांची मागणी

केंद्र व भाजपने देशाची माफी मागावी, अशोक चव्हाणांची मागणी

विमल पाटील : टीम लय भारी

मुंबई : आज सकाळी पंतप्रधानांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यालाच अनुसरुन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी मागणी केली आहे. ‘केंद्राचे तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे. या कायद्यांविरोधातील आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेली दडपशाही, अत्याचार व अवमानाबद्दल केंद्र सरकार व भाजपाने देशाची माफी मागावी,’ अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे (Ashok Chavan’s demand apology  to Central Government and BJP).

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला अनेक ठिकाणी दारूण पराभव स्वीकारावा लागला. उत्तर प्रदेश, पंजाब व अन्य राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीतही शेतकरी आंदोलनाचा फटका बसू शकतो, याची भीती केंद्र सरकारला जाणवू लागली होती. त्यामुळेच उशीरा का होईना केंद्राला हा निर्णय घ्यावा लागला. हाच निर्णय अगोदर घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकले असते,’ असे मत चव्हाणांनी व्यक्त केले.

Ashok Chavan : आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांनी कष्टकऱ्यांना 7500 रूपये द्यावेत

अशोक चव्हाणांशी संबंधित साखर कारखाने आयकर विभागाच्या रडारवर

राहूल गांधी यांच्या भाकिताची विशेषत: चव्हाणांनी आठवण करुन दिली, केंद्राच्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना दहशतवादी, देशद्रोही अशी अनेक दूषणे देण्यात आली. त्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारण्याचा प्रकार घडला. या साऱ्या प्रकारांबाबत देशाची व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. शेतकऱ्यांसमोर झुकून केंद्राला एक दिवस हे कायदे रद्द करावेच लागतील, असे भाकित राहुल गांधीनी केले होते.

आमदार शरद रणपिसे यांचे निधन, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला शोक

Entity linked to former Maharashtra CM Ashok Chavan under IT scanner

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी