33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयआमदार शरद रणपिसे यांचे निधन, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला शोक

आमदार शरद रणपिसे यांचे निधन, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला शोक

टीम लय भारी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते शरद रणपिसे यांचे गुरुवारी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. यावर आपली प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली (Sharad Ranapise MLA passes away, Ashok Chavan expresses grief).

काँग्रेस विचारधारेसाठी समर्पित एक सच्चा सेनानी काळाच्या पडद्याआड गेल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे.

ठाकरे सरकारने परिवहन प्रकल्पांचा गेल्या दोन वर्षात पूर्ण बट्ट्याबोळ : अतुल भातखळकर

इम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारची असमर्थता

रणपिसे यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.

 शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि विधीमंडळात सहकारी म्हणून आम्ही एकत्र काम केले होते. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य होते. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात त्यांची हातोटी होती. त्यांनी दीर्घ काळ काँग्रेस पक्ष व लोकांची सेवा केली. त्यांच्या अकस्मात निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

रणपिसे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आणि जिल्ह्यातील पर्वती मतदार संघातून दोन वेळा आमदार होते. ते एमएलसी आणि राज्य विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते होते.

जादूटोण्याच्या घटना बंद, कृती आराखडा तयार : विजय वडेट्टीवार

Sharad Ranapise
आमदार शरद रणपिसे यांचे निधन, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला शोक

Maha: Senior Congress leader Sharad Ranpise dies at 71

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी