33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईबेस्टच्या प्रवाशांसाठी 'टॅप इन, टॅप आउट' सुविधा सुरू, अदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

बेस्टच्या प्रवाशांसाठी ‘टॅप इन, टॅप आउट’ सुविधा सुरू, अदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

टीम लय भारी

मुंबई : बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाद्वारे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता बेस्ट उपक्रमानं प्रवाशांकरीता अनोखी सुविधा आणली आहे. मुंबईमध्ये बेस्ट नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन गोष्टी अमलात आणत असते. आता मुंबई सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट बसने तिकीट काढण्यासाठी आपल्या बसेसवर ‘टॅप इन, टॅप आउट’ ( BEST passengers )असे डिजिटल स्मार्ट उपकरणे बसवली आहेत. हे मशीन तुम्ही मोबाईल आणि कार्डद्वारे वापरू शकता. तसेच आवश्यक असल्यास कागदी तिकिटे देखील वापरता येतील. BEST passengers

पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंच्या हस्ते टॅप-इन टॅप-आउट सेवेचे उद्‌घाटन

उद्‌घाटनाच्या वेळी माध्यामांशी बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले, गेटवे ऑफ इंडिया ते चर्चगेट या मार्गावरील टॅप-इन टॅप-आउट (BEST passengers) सेवेचे अभिमानाने उद्‌घाटन करून तणावमुक्त प्रवास सुरू केला. आम्ही काही दिवसांत या मार्गावरील सर्व 10 बसेसमध्ये याची अंमलबजावणी करणार आहोत आणि नंतर सर्व 438 मार्गांवर त्याचा विस्तार करू.

ही बससेवा ( BEST passengers) सुरुवातीला काही निवडक बसगाड्यांवर उपलब्ध असणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरामध्ये सदर सेवा उपलब्ध करण्यात येइल. जे प्रवासी या अॅपचा किंवा कार्डचा वापर करतील अशाच प्रवाशांना १०० टक्के डिजिटल बसगाड्यांचा वापर करण्याची मुभा असेल. या डिजिटल बसगाड्यांच्या वापर करण्याच्या बाबतीत नवीन असलेल्या बसप्रवाशांना सहाय्य करण्याकरिता सुरुवातीला बसवाहक देखील उपलब्ध असेल.

दरम्यान या सुविधेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहान बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबत बोलताना बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले, टॅप इन, टॅप आउट (BEST passengers)  हि सुविधा देशात सर्वप्रथम बेस्ट वापरत आहे. या सुविधेमुळे नागरिकांना प्रवास करणे आणखी सोपे होणार आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Mumbai To Become First City In The Country To Get 100% Digital Buses With Tap In, Tap Out Facility. Details Here

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यानंतर आता मनसेकडून CCTV चा मुद्दा गाजणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी