30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयमशिदीवरील भोंग्याच्या मुद्यानंतर आता मनसेकडून CCTV चा मुद्दा गाजणार

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यानंतर आता मनसेकडून CCTV चा मुद्दा गाजणार

टीम लय भारी

 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यतील राजकारणात भोंगा आणि हनुमान चालिसा या दोन गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. गुढीपाडव्याच्या औचित्यावर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत एक वक्तव्य केले. राज ठाकरेंनी मशीदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्यासाठीचा महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिले.आता राज्याच्या गृह विभागानेही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय करायला सुरूवात केली आहे. भोंग्यांचा विषय देशभर गाजत असतानाच मनसेकडून आता CCTV च्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. याबाबत मनसे नेते बाळानांदगावकर यांनी ट्विट केले आहे. (MNS’s new demand, CCTV on the mosque)

जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? “सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, असे ट्विट बाळानांदगावकर यांनी केले आहे.


हे सुद्धा वाचा :

 

रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं

भाजपाने भोंगा वाजवताच मुंबई पालिका प्रशासनाला जाग, वरिष्ठ अधिकारी नालेसफाईसाठी रस्त्यावर : आशिष शेलार

रेल्वेप्रशासन साईनगर शिर्डी ते ढेहर का बालाजी दरम्यान २० उन्हाळी विशेष गाड्या चालविणार

VIDEO : बाटलीतल्या गंगाराम सोबत पंगा घेणारा ‘कवट्या महाकाल’ आहे तरी कोण?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी