29 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeटॉप न्यूजदोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या, भाजप नगरसेवकांची महापौर दालनासमोर जोरदार...

दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या, भाजप नगरसेवकांची महापौर दालनासमोर जोरदार निदर्शने

टीम लय भारी

मुंबई : सर्व कोविड नियमांचे काटेकोर पालन करत भाजपच्या नगरसेवकांनी महापौर दालनासमोर आंदोलने केली. महापालिकेतील सर्व सभा प्रत्यक्ष घ्या व त्याच बरोबर दोन डोस झालेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली (BJP corporators protest loudly in front of the mayor’s office, Let the journalists who have taken two doses enter the meeting).

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. अशातच लसीचे दोन डोस घेतलेल्याना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. पत्रकारांनाही हा नियम लागू करून सभेस उपस्थित राहण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

जादूटोण्याच्या घटना बंद, कृती आराखडा तयार : विजय वडेट्टीवार

साताऱ्यातील मिलिटरी गावाचा इतिहास जगासमोर येणार, मंत्री दादा भुसे यांचा निर्णय

राज्य शासनाने जास्त गर्दी होत असलेल्या मोहरमच्या मिरवणुकीस देखील परवानगी दिलेली होती. भारताचे सर्वोच्च सभागृह असलेली लोकसभा प्रत्यक्ष स्वरुपात होते. मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष सभा अद्यापही प्रत्यक्ष न घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलला हे नीट ऐकू येत नाही तसेच प्रतिध्वनी सुद्धा ऐकू येतो. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. त्यामुळे सदर सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्ष घेणे आवश्यक आहे असल्याची मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

BJP corporators
भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे

BJP corporators demand in-person meetings at BMC

महापालिका सभा व सर्व वैधानिक समित्यांच्या सभा आभासी पद्धतीने होत असल्याने पत्रकारांनाही या सभांमध्ये सहभागी होता येत नाही. प्रशासनाला वारंवार विनंती करूनही पत्रकारांना सभांमध्ये आभासी पद्धतीने आजवर सहभागी करून घेतलेले नाही.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार तुम्हाला महापालिका सभेत का नको आहेत ? असा सवाल करत पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी व पारदर्शक कारभारासाठी महापालिकेच्या वैधानिक समिती व विशेष समिती सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्यात याव्यात तसेच सर्व सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश द्यावा अशी मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी