30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयवर्षा गायकवाडांना भाजप शिक्षक आघाडीचे पत्र, शाळा सुरू करण्याअगोदर समस्या सोडविण्याची मागणी

वर्षा गायकवाडांना भाजप शिक्षक आघाडीचे पत्र, शाळा सुरू करण्याअगोदर समस्या सोडविण्याची मागणी

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद होत्या. सोमवार दि. ४ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु शाळा सुरु करण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे शैक्षणिक संस्थांपुढे अडचणी येत असल्याचे भाजप शिक्षक आघाडीने सांगितले आहे (BJP leader wrote letter to Education Minister Varsha Gaikwad).

या संदर्भात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात बोरनारे यांनी काही मागण्या केल्या आहेत. तसेच या मागण्या तातडीने सोडवण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर, मुख्याध्यापक, संस्थाचालकांना दिलासा द्यावा अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

शाळकरी मुलांना मिळणार शेतीचे शिक्षण

अजित पवार म्हणाले, आधी मास्तरांना लस देणार; मग शाळा सुरू करणार

पत्रात करण्यात आलेल्या मागण्या खालीलप्रमाणे

१) खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व सेल्फ फायनान्स शाळांचे सॅनिटायझेशन करून कोरोना प्रतिबंधक सामुग्री (ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझर, थर्मामिटर) तातडीने पुरविण्यात यावे

२) मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ खाजगी विनाअनुदानित, सेल्फ फायनान्स शाळांमधील विद्यार्थ्यांना द्यावा

३) मुंबईतील विद्यार्थ्यांना व एक डोस घेतलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना लोकल प्रवासास परवानगी द्यावी

Sharad Pawar

‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांचा भार हलका, शिक्षणात पंचवीस टक्के कपात; वर्षा गायकवाडांची माहिती

Schools in Mumbai for Class 8 to 12 to reopen from October 4

४) कोरोना काळात उद्योगधंदे बंद पडल्याने स्थलांतर केलेल्या पालकांच्या पाल्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे

५) मुंबईतील ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनामुळे रद्द झालेली शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात यावी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी