31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईबिग बींना तूर्तास दिलासा! BMC ची कारवाई अद्याप करू नये, उच्च...

बिग बींना तूर्तास दिलासा! BMC ची कारवाई अद्याप करू नये, उच्च न्यायालयाचा आदेश

टीम लय भारी

मुंबई: बॉलीवूड मधील शेहनशाह व ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याचा काही भाग ताब्यात घेण्यात येणार आहे अशी मुंबई महानगर पालिकेने त्यांना नोटीस बजावली होती. मात्र  मुंबई महापालिकेच्या या नोटिसवर तूर्तास कारवाई करू नये असे  मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.(BMC should not take action against Big B yet, High Court orders)

महापालिका रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जागा वाढवून घेऊ शकते. गेल्या चार वर्षांत महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही, असा जाब खंडपीठाने  विचारला होता. त्यावर हि नोटीस जरी केल्याचे म्हंटले जात होते.

जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगल्यातील भिंतीसह काही भाग रस्त्याचा असून तो ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने बच्चन यांना एप्रिल २०१७ मध्ये दोन नोटिसा बजावल्या होत्या. आणि त्याविरोधात मात्र अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी उच्च न्यायालयात याचिका जाहीर केली आहे. त्यादरम्यान  न्या. रमेश धनुका आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे आज त्यावर सुनावणी केली व तूर्तास बंगल्यावर कोणतीच कारवाई करू नये असे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

मलबार हिल ट्रीटॉप वॉकवेच्या बांधकामासाठी BMC देणार 22 कोटींचे कंत्राट

फेब्रुवारीच्या अखेरीस 100% अनलॉक, BMC ने दिले संकेत

BMC:मुंबई महापालिकेची नगरसेवक संख्या नऊने वाढवली

Amitabh Bachchan in Prabhas-Pooja Hegde’s ‘Radhe Shyam’? Here’s the BIG B connection

न्यायालयाने बच्चन यांना नोटिशीबाबत महापालिकेकडे दोन आठवड्यांत निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत . त्यावर महापालिकेने सहा आठवड्यांत निर्णय घ्यावा आणि त्यानंतर तीन आठवडे कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. आवश्यकता असेल तर बच्चन यांची बाजू वकिलांमार्फत व्यक्तिशः ऐकून घ्यावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी