33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्यापार-पैसारेपो रेटमुळे वाढलेलं खर्चाचं बजेट आता 'एफडी'मुळे कमी होणार ; 'या' बँकांनी...

रेपो रेटमुळे वाढलेलं खर्चाचं बजेट आता ‘एफडी’मुळे कमी होणार ; ‘या’ बँकांनी वाढवले व्याजदर

आता RBI रेपो रेट 6.25 टक्के झाला आहे. या वाढीमुळे लोकांवर कर्जाच्या ईएमआयचा बोजा वाढत आहे. यासोबतच एफडी स्कीम आणि सेव्हिंग अकाऊंट यांसारख्या डिपॉझिट स्कीमवर जास्त परतावा मिळत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. या वाढीपासून, अनेक बँका त्यांच्या कर्जाचे व्याजदर आणि रेपो दर सातत्याने वाढवत आहेत. अलीकडे, 7 डिसेंबर, 2022 रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या चलनविषयक धोरण बैठकीत पुन्हा एकदा रेपो दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बँकेने 35 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता RBI रेपो रेट 6.25 टक्के झाला आहे. या वाढीमुळे लोकांवर कर्जाच्या ईएमआयचा बोजा वाढत आहे. यासोबतच एफडी स्कीम आणि सेव्हिंग अकाऊंट यांसारख्या डिपॉझिट स्कीमवर जास्त परतावा मिळत आहे.

अलीकडेच, देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेने त्यांच्या एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवर हे दर वाढवण्यात आले आहेत. नवीन दर 14 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. त्यानंतर आता आणखी एका बँकेने 2 कोटींपेक्षा कमी एफडी वाढवली आहेत. ही बँक कोटक महिंद्रा बँक आहे. RBI च्या रेपो दरात वाढ केल्यानंतर या बँकेने रेपो दरात एकूण तीन वेळा वाढ केली आहे. नवीन दर 15 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. यापूर्वी, 10 डिसेंबर आणि 14 डिसेंबर 2022 रोजी बँकेने त्यांच्या एफडीच्या व्याजदरातही वाढ केली होती. कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना किती व्याजदर देत आहे ते आता जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारेचे सरकार; राम कदम यांचा ‘पठाण’वरून इशारा

पुण्यातून रेल्वेने प्रवास करणार आहात, तर ही बातमी नक्की वाचा

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राने 35 हजार कोटींची केलेली गुंतवणूक कौतुकास्पद !

कोटक महिंद्रा बँकेच्या नवीन एफडी व्याजदरांबद्दल जाणून घ्या-
-7 ते 14 दिवसांची FD – 2.75%
-15 ते 30 दिवसांची FD – 3.00%
-31 ते 45 दिवसांची FD – 3.25 टक्के
-46 ते 90 दिवसांची FD – 3.50 टक्के
-91 ते 120 दिवसांची FD – 4.00 टक्के
-121 ते 179 दिवसांची FD – 4.25%
-180 ते 363 दिवसांची FD – 5.75%
-364 दिवस FD – 6.00%
-365 ते 389 दिवसांची FD – 6.75%
-390 ते 23 महिन्यांपर्यंत FD – 7.00 टक्के
-23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपर्यंत FD – 6.50%
-2 ते 3 वर्षांची FD – 6.40 टक्के
-3 वर्षे ते 4 वर्षे FD – 6.30 टक्के
-4 ते 5 वर्षांसाठी FD – 6.25 टक्के
-5 ते 10 वर्षे FD – 6.20 टक्के

HDFC बँकेच्या नवीन FD व्याजदरांबद्दल जाणून घ्या-
HDFC बँक (HDFC Bank FD Rates) ने देखील त्यांच्या 2 कोटींपेक्षा कमी FD वर व्याजदर वाढवला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर 14 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 3.00 टक्के ते 7.00 टक्के व्याजदर देत आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी उपलब्ध व्याजदरांबद्दल जाणून घ्या-
-7 ते 29 दिवसांची FD – 3.00 टक्के
-30 ते 45 दिवसांची FD – 3.50 टक्के
-46 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंत FD – 4.50%
-6 महिने ते 9 महिने FD – 5.75%
-9 महिने ते 1 वर्षापर्यंत FD – 6.00 टक्के
-1 वर्ष ते 15 महिन्यांपर्यंत FD – 6.50 टक्के
-15 महिने ते 10 वर्षे FD – 7.00 टक्के

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी