31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमहाराष्ट्रपुण्यातून रेल्वेने प्रवास करणार आहात, तर ही बातमी नक्की वाचा

पुण्यातून रेल्वेने प्रवास करणार आहात, तर ही बातमी नक्की वाचा

जर का यापुढे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुण्यातुन ट्रेनने प्रवास करायचा असेल तर त्यांना कमीत कमी एक तास आधीच पुणे रेल्वे स्थानकावर हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे पुण्यातून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशानाची किमान तासभर आधी रेल्वे स्थानकावर हजर राहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेन स्थानकावरून सुटण्याच्या काही मिनिटे आधी स्थानकावर पोहोचण्याची सवय आहे. परंतु पुण्यातून ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता असे करता येणार नाही. कारण यापुढे आता पुणे रेल्वे स्थानकातून प्रवास (Pune Railway Travellers) करणाऱ्या प्रवाशांना किमान एक तास आधी तरी रेल्वे स्थानकावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नियोजित ट्रेन सुटण्याच्या आधी किमान तासभर प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर पोहोचावे लागणार असल्याचा सल्ला रेल्वे व्यवस्थापनाकडून प्रवाशांना देण्यात आलेला आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेनमधून प्रवाशांकडून चेन खेचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये आतापर्यंत 1164 चेन खेचण्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये 914 प्रवाशांना रेल्वे पोलिसांकडून अटक देखील करण्यात आलेली आहे. या प्रवाशांना न्यायालयात हजर केले असता दोषी प्रवाशांकडून तब्बल एक लाख 80 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. महत्वाची बाब म्हणजे चेन पुलिंगच्या प्रकरणी दोषी प्रवाशाला तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. परंतु आता यापुढे रेल्वे प्रशासनाकडून आणखी कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी एक तास आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचणे बंधनकारक राहणार आहे.

पुण्यामध्ये वाहतूक कोंडीच्या कारणामुळे अनेक प्रवासी हे नियोजित ट्रेनच्या वेळेमध्ये रेल्वे स्थानकावर पोहोचू शकत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा जो प्रवासी रेल्वे स्थानकावर पोहोचू शकत नाही, त्याचे नातेवाईक हे मुद्दामहून ट्रेन सुरू झाल्यावर चेन खेचण्याचे काम करतात. ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते अन्य प्रवाशांना देखील बसतो.

हे सुद्धा वाचा

ममता कुलकर्णी ड्रग्स प्रकरणाची कागदपत्रे झाली गहाळ

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राने 35 हजार कोटींची केलेली गुंतवणूक कौतुकास्पद !

संभाजी महाराजांना दुर्लक्षित करणाऱ्या ‘कालनिर्णय’ला उशिराने सुचले शहाणपण !

दरम्यान, ट्रेनमधील चेन खेचण्याचे अर्थ चेन पुलिंगचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अशा घटना टाळण्यासाठी ज्याप्रमाणे विमानतळावर प्रवाशांना काही तास आधी पोहोचावे लागते, त्याचप्रमाणे आता पुणे येथून रेल्वे प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना तासभर आधीच रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. अशा पद्धतीचे आवाहन देखील आता रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!