33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारेचे सरकार; राम कदम यांचा 'पठाण'वरून इशारा

महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारेचे सरकार; राम कदम यांचा ‘पठाण’वरून इशारा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट नविन वर्षात प्रदर्शित होणार असून तो वादात सापडला आहे. (Pathan Film Controversy) या तित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे नुकतेच रिलीझ झाले असून या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन सध्या वाद पेटला आहे. अनेक हिंदुत्त्ववादी संघटना आणि साधु संतानी या चित्रपटाला विरोध केला असून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी देखील हिंदुत्त्वाचा अपमान करणारी कोणतीही फिल्म अथवा सिरीयल चालू देणार नाही असा इशारा ट्विटरवरून दिला आहे.

राम कदम यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”पठाण फिल्मला देशभरातील साधू संत महात्मा सहित सोशल मीडियावर देखीलअनेक हिंदू संघटना आणी करोडो लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत. महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे. अधिक बरे राहील. फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक समोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. साधू संतानी जे आक्षेप घेतलेत त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे ते जनते समोर यावे. मात्र महाराष्ट्रच्या भूमी वर हिंदुत्व चा अपमान करणारी कोणतीही फिल्म वा सिरीयल चालू देणार नाही. खपवून घेतली जाणार नाही. जय श्रीराम”
पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाणे रिलीझ झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे.

हा चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड देखील चालवला जात आहे. या चित्रपटातील गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरून या चित्रपटाला सध्या जोरदार विरोध होत आहे. हिंदू धर्मात भगव्या रंगाला महत्त्व असल्याने अनेक हिंदुत्त्ववादी संघटना, साधु संतानी या चित्रपटाला विरोध केला आहे. अयोध्येत देखील साधु महिंतानी या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. तसेच महंत राजू दास यांनी या चित्रपटावर बहिष्कार घालावा, हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवल्यास चित्रपटगृह जाळण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे.
हे सुद्धा वाचा

Salman And Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग अन् दबंग दिसणार एकाच पडद्यावर! ‘टायगर 3’ आणि ‘पठाण’ बाबत मोठी बातमी समोर

PHOTO: निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

Shah Rukh Khan: किंग खान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये होणार सन्मानित

त्यानंतर आता भाजपचे नेते राम कदम यांनी देखील फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक समोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. साधू संतानी जे आक्षेप घेतलेत त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे ते जनते समोर यावे, अशी मागणी केली आहे. . महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे, महाराष्ट्रच्या भूमी वर हिंदुत्व चा अपमान करणारी कोणतीही फिल्म वा सिरीयल चालू देणार नाही. खपवून घेतली जाणार नाही, असे म्हटले आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी