32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमुंबईखबरदार: राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

खबरदार: राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

टीम लय भारी

मुंबई: देशात करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे शुक्रवारी २५ रुग्ण आढळले असून या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या करोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत तीन आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनच्या चार रुग्णांचे शुक्रवारी निदान झाले. त्यांत एका तीन वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. मुंबईतील एक रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. (Caution: big decision of state government)

राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४  लागू करण्यात आले. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली/मोर्चे/मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

ओमायक्रॉनचे संकट: गुगलचे कर्मचारी करणार वर्क फ्रॉम होम

 ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. याआधी ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूमुळे जमावबंदीसारखे निर्बंध अकोला जिल्ह्यात लावण्यात आले होते.

शुक्रवारी सापडलेला ओमायक्रॉनबाधित रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. तो गेल्या आठवड्यात टांझानियातून आला आहे. त्याने लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. मुंबईत आणखी दोन ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी एक लंडनहून, तर दुसरा दक्षिण आफ्रिकेतून आला होता. त्यामुळे मुंबईतील ओमायक्रॉन बाधितांची संख्या पाच झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेले चारही रुग्ण नायजेरियातून आलेल्या ओमायक्रॉनबाधित महिलेचे नातेवाईक आहेत.

कोरोना लस संशोधनातील ‘भीष्माचार्य’ काळाच्या पडद्याआड

Amid Omicron Alarm, Mumbai Bans Large Gatherings For 2 Days

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी